Akshaya Tritiya Puja Vidhi: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. या दिवशी विष्णूचा (Lord Vishnu)अवतार असलेल्या परशुरामाचादेखील (Parshuram) जन्म झाला असल्याने अक्षय्य तृतीयेसोबत परशुराम जयंती साजरी केली जाते. अनेकजण या दिवशी शुभ कार्याची सुरूवात करतात. काही जण अक्षय्य तृतीयादिवशी सोनं खरेदी करतात. पण सध्या लग्नसराई आणि अक्षय्य तृतीयेचा मंगल मुहूर्त एकत्र आल्याने सोन्याचा भाव अधिक चढा होण्याची शक्यता असते.(Akshaya Tritiya 2019: जाणून घ्या काय आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचे महत्व; पूजा आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त)
सोनं खरेदीचं महत्त्व
सोनं हा सर्वात मौल्यवान धातू आणि भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने दागिने किंवा किमान वळं, कॉईन अशा स्वरूपात सोनं खरेदी केली जाते. पण यंदा सोन्याच्या स्वरूपात लक्ष्मी घरात आणणं तुम्हांला शक्य नसल्यास इतर कोणकोणत्या वस्तू आज घरात आणणं तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतात हे देखील नक्की जाणून घ्या.
# सोनं 24, 23,22,18 कॅरेटमध्ये उपलब्ध असतात मात्र त्याचा तोळ्यामागील दर किमान 25-30 हजार आहे. तो तुम्हांला शक्य नसल्यास आजकाल अनेक दागिने, वस्तू 1 ग्रॅम सोन्यामध्ये बनवले जातात. यामध्ये इतर धातूने बनवलेली वस्तू आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. Happy Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीया दिवशी जाणून घ्या सोन्याचे आजचे दर
#सोन्यापेक्षा चांदी थोडी स्वस्त आहे. त्यामुळे लक्ष्मीची चांदीची मुर्ती, पादुका घरात आणणं आज फायदेशीर ठरू शकतं. (Gold Purity Guide: अक्षय्य तृतीया दिवशी Gold Coin, वळं, दागिने विकत घेण्यापूर्वी जाणून घ्या 24k, 22k आणि 18k सोन्यातला फरक)
#लक्ष्मीची पारदर्शक स्फटिकाची मुर्तीदेखील उपलब्ध असते. आज सोन्याऐवजी लक्ष्मीच्या अशा स्वरूपातील मूर्तीची पूजा करणंदेखील फायदेशीर आहे.
#लक्ष्मीची मुर्ती आणणं शक्य नसल्यास कॉईनच्या स्वरूपातील लक्ष्मीची कॉईन्स देखील पूजेमध्ये ठेवली जाऊ शकतात.
आजचा दिवस खास असण्यामागील अजून एक कारण म्हणजे तब्बल 16 वर्षांनंतर आज अक्षय्य तृतीया आणि स्थिर योग यांच्या संयोगामुळे आज केलेले दान आणि लक्ष्मीची पूजा करणं अधिक फायदेशीर ठरणार आहे.
टीप: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारीत आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.