Sonalee Kulkarni हिने आपल्या कुटूंबासह अगदी साधेपणाने घरच्या घरी केले आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन; Watch Video
Sonalee Kulkarni Ganesh VIsarjan 2020 (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा फेम सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिच्या घरी गणेश चतुर्थीला आलेल्या गणपती बाप्पाचे आज विसर्जन करण्यात आले. सोनालीने अगदी साधेपणाने घरच्या घरी आपल्या कुटूंबासमवेत लाडक्या बाप्पाचे कुंडीत विसर्जन केले. यावेळी तिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar)  देखील उपस्थित होता. हा व्हिडिओ तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सोनालीच्या भावाने शाडूच्या मातीची सुंदर अशी मूर्ती बनविली होती. सोनालीचा भाऊ अतुल कुलकर्णी गेल्या 3 वर्षांपासून शाडूच्या मातीची मूर्ती घडवतो आणि मग सोनाली हळदी-कुंकूवाच्या पाण्याने त्यावर रंग रंगोटीचे काम करते.

सोनालीने घरच्या गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आपल्या गॅलरीतील कुंडीत या इको फ्रेंडली गणपती बाप्पाचे विसर्जन केले. Marathi Celebrity Ganpati 2020: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या घरी 'अशी' घडली इको फ्रेंडली गणपती बाप्पाची ही मनमोहक मूर्ती, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

गेल्या काही वर्षांपासून अनेक कलाकारांसह अनेक लोकही इको फ्रेंडली गणपती आणण्यावर वा ती घरीच बनविण्यावर भर देत आहेत.

 

View this post on Instagram

 

🙏🏻 पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏻

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

अलीकडेच सोनालीने आपल्या साखरपुड्याला 6 महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने छान फोटोशूट केले होते. तिने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरुन शेअर केले असुन तिचे फॅन्स सुद्धा यावर खुश झाले होते.