Sonalee Kulkarni Engagement: सोनाली कुलकर्णी हिचा होणारा नवरा कुणाल बेनोडेकर नेमका आहे कोण? जाणून घ्या त्याच्याविषयी 'या' खास गोष्टी
मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने आपला होणारा नवरा कुणाल बेनोडेकर याच्या सोबत साखरपुड्याचे फोटो शेअर करुन सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला. सोनालीचा Fiancee कुणाल बेनोडेकर हा चित्रपट सृष्टीतील नाही त्यामुळे तो नेमका कोण आहे? काय करतो? कुठे राहतो? असे सर्व प्रश्न तिच्या चाहत्यांंना पडले आहेत, याची उत्तरे जाणुन घ्या.
Sonalee Kulkarni Engagement: मराठी चित्रपट सृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने काल 18 मे रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपला सर्व फॅन्सना एक आनंदाचा धक्का दिला. सोनालीने आपला होणारा नवरा म्हणजेच कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) याच्याशी साखरपुडा झाल्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनाली आणि कुणाल ने कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये (Dubai) साखरपुडा करून घेतला. सोनालीचा Fiancee कुणाल बेनोडेकर हा चित्रपट सृष्टीतील नाही त्यामुळे तो नेमका कोण आहे? काय करतो? कुठे राहतो? असे सर्व प्रश्न सोनालीच्या चाहत्यांना पडले आहेत. चला तर मग या प्रश्नाची उत्तरे आणि कुणाम बेनोदेकर याच्या विषयीच्या खास गोष्टी या लेखातून जाणून घेऊयात..
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांंच्या साखरपुड्याचे फोटो पाहा
कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक मधील भागात कुणाल काम करतो. कुणालने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड सोशल सायन्स येथून उच्च शिक्षण घेतले आहे. तर त्यापूर्वी लंडन मध्येच त्याने मर्चंट्स टेलर स्कूल येथून BSC शिक्षण पूर्ण केले होते. तो लंडन मध्ये वास्तव्यास असुन काही वर्षांपासुन कामानिमित्त दुबई येथे असतो. मागील अनेक वर्ष कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप सोनालीने लग्नाची तारिख किंवा लग्नानंतर शिफ्ट होणार का याविषयी मौन बाळगले आहे.
सोनाली कुलकर्णी पोस्ट
Nawazuddin Siddiqui ला बायको Aaliya Siddiqui ने पाठवली घटस्फोटाची नोटिस - Watch Video
यापूर्वी सोनालीने एकदा एका व्हिडिओमधून कुणाल ची एक झलक सर्वांना दाखवली होती, तेव्हा सुद्धा त्यांच्या डेटिंग विषयी चर्चा झाल्या होत्या. मध्यंतरी तिने एका जाहिरातीसाठी उलटे मंगळसूत्र घालून फोटो पोस्ट केले होते, त्यावरूनही अनेकांनी तिच्या लग्ना संबधी प्रश्न केले. अखेरीस काल या चर्चा आणि प्रश्नांवर सोनालीने उत्तर दिले आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 19, 2020 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

