Marathi Celebrity Ganpati 2020: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या घरी 'अशी' घडली इको फ्रेंडली गणपती बाप्पाची ही मनमोहक मूर्ती, Watch Video
Sonalee Kulkarni's Bappa (Photo Credits: Instagram)

ज्या दिवसाची सर्व गणेश भक्त आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस अखेर आज आलाच. या दिवसाची सेलिब्रिटींनाही तितकीच ओढ लागलेली असते ज्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यातील अनेक कलाकार आपल्या चाहत्यांना सामाजिकतेचा आणि पर्यावरणाचा संदेश देत घरीच शाडूच्या मातीची सुरेख मूर्ती बनवतात. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) यात खारीचा वाटा उचलला आहे. गेली 3 वर्षे ती घरातच आपल्या बाप्पाची सुंदर मूर्ती बनवून त्यालाच विराजमान करत आहे. यंदाही तिने आपल्या कुटूंबासोबत मिळून सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे.

सोनालीचा भाऊ अतुल कुलकर्णी गेल्या 3 वर्षांपासून शाडूच्या मातीची मूर्ती घडवतो आणि मग सोनाली हळदी-कुंकूवाच्या पाण्याने त्यावर रंग रंगोटीचे काम करते. Ganesh Chaturthi 2020 Images: गणेश चतुर्थी निमित्त शुभेच्छा देताना मराठी HD Wallpapers, WhatsApp Status शेअर करुन गणेश भक्तांचा दिवस करा खास!

 

View this post on Instagram

 

यंदा चं हे तिसरं वर्ष, आम्ही आमची गणेश मुर्ती आमच्या घरीच बनवतो.. माझा भाऊ @atulkulkarni11 शाडूच्या माती ची मुर्ती घडवतो आणि मी हल्दी-कुंकुवाच्या पाण्याने रंग रंगोटीचं काम करते... या वर्षी आमचा मित्र @___i_shaan___ ने त्याची मुर्ती ही आमच्याच बरोबर बनवली 🙏🏻 P.S. आम्ही यंदा शंकराचं रूप घडवण्याचा प्रयत्न केलाय... #thedestroyer #lordshiva #hattrick #ecofriendly #ganeshmurti #ganpatibappamoraya

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

सोनाली सह रवी जाधव, प्रार्थना बेहरे असे अनेक कलाकार घरीच इको फ्रेंडली गणपती बाप्पा साकारत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदा सार्वजनिकरित्या होणार नसला तरीही आपण आपल्या घरगुती बाप्पाचे छान आदरातिथ्य करुन हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करू शकता. सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!