देशात कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण वाढत आहे, या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम, सण-उत्सव रद्द केले आहेत. यंदा देशात होणाऱ्या अनेक यात्रादेखील यामुळे रद्द झाल्या आहेत. आता देशातील सर्वात महत्वाची यात्रा अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2020) देखील रद्द झाली आहे. ‘सध्या परिस्थितीमुळे श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाने निर्णय घेतला की, यावर्षीची श्री अमरनाथजी यात्रा आयोजित करणे उचित नाही, त्यामुळे यंदाची अमरनाथ यात्रा 2020 रद्द केली जात आहे.’ जम्मू-काश्मीर सरकारने (Jammu-Kashmir Government) याबाबत माहिती दिली आहे. मात्र भाविकांना सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) पाहता येणार आहे.
शिवभक्तांना घरी बसून सकाळी 6 वाजता बाबा अमरनाथच्या दुर्मिळ आरतीचा हिस्सा बनता येणार आहे. यासाठी दूरदर्शनने (Doordarshan) लाईव्ह स्ट्रिमिंग सुरु केले आहे, ज्याद्वारे हिमायातील पवित्र गुफेचे लाइव्ह ब्रॉडकास्ट केले जाणार आहे. यंदाची यात्रा जरी रद्द झाली असली तरी, पूर्वीच्या प्रथाप्रमाणे पारंपारिक विधी पार पाडले जातील, असेही कळवण्यात आले आहे. यंदा 21 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाणार होते.
दूरदर्शनवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बाबा अमरनाथच्या आरतीचे थेट प्रक्षेपण -
शिव भक्त घर बैठे बनें बाबा अमरनाथी के दुर्लभ आरती का हिस्सा, सुबह 6 बजे जरूर देखें DD National पर सीधे हिमालय के पवित्र गुफा लाइव प्रसारण और https://t.co/XSIufeHPpi पर लाइव स्ट्रीमिंग।#AmarnathYatra pic.twitter.com/5Fen7AYOvK
— Doordarshan National (@DDNational) July 21, 2020
इतिहासात प्रथमच बाबा अमरनाथच्या आरतीचे हिमालयीन गुफेमधून दूरदर्शन वाहिनीवर थेट प्रसारण केले जात आहे. अमरनाथचे दर्शन आणि आरतीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी अमरनाथ श्राईन बोर्डाने विशेष व्यवस्था केली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने थेट आरती प्रसारित करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.
दरम्यान, अमरनाथ हे हिंदूंचे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे काश्मिर राज्यातील श्रीनगर शहराच्या ईशान्य दिशेला 135 मीटर अंतरावर, समुद्रसपाटीपासून 13,600 फूट उंचीवर आहे. या गुहेची लांबी (खोलीच्या आतील बाजू) 19 मीटर आणि रुंदी 14 मीटर आहे. ही गुहा 11 मीटर उंच आहे. अमरनाथ गुहा हे भगवान शिवाचे एक प्रमुख मंदिर आहे. अमरनाथला तीर्थक्षेत्र म्हटले जाते कारण, येथेच भगवान शिवने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले होते, अशी मान्यता आहे. आषाढ पौर्णिमेपासून रक्षाबंधन पर्यंत चालू असणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येतात.