Mother’s Day 2024: तब्बल 89 टक्के भारतीय माता आपल्या मुलांच्या स्क्रीन टाइम(Screen Time)बद्दल चिंतित आहेत, असे एका अहवालातून समोर आले आहे. मार्केट रिसर्च फर्म Techarc ने मदर्स डे निमित्त जारी केलेला हा अहवाल चार मेट्रो शहर (Metro City) मधील 600 व्यवसाय करणाऱ्या मातांच्या सर्वेक्षणावर (Survey) आधारित आहे. ज्यांचे किमान एक मूल शाळेत 3-10 वर्गात शिक्षण घेत आहे. हा अहवाल डिजिटल इकोसिस्टमवर अंतर्दृष्टी टाकणारा आहे. “मातांचा असा विश्वास आहे की वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे त्यांच्या पाल्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो,” असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा:Mother’s Day 2024: CSK, RCB, KKR, PBKS आणि इतर IPL फ्रँचायझीकडून मदर्स डे निमित्त विशेष पोस्ट)
पुढे, अहवालात असे दिसून आले आहे की वाढत्या मोबाईलच्या वापरामुळे त्यांच्या पाल्यांमध्ये प्रायव्हसी 81 टक्के वाढली आहे. त्याशिवाय, अनुचित सामग्री 72 टक्के, किशोरवयीन प्रभावक 45 टक्के वाढले आहेत. तसेच डिप फेकची प्रकरणे या प्रमुख समस्या आहेत. डिप फेक व्हिडीओ आणि Gen AI भविष्यात त्यांच्या समस्या वाढवू शकतात, असे मातांचे म्हणणे आहे.
त्याशिवाय, माता व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल देखील चिंतित आहेत. विशेषत: ऍपल व्हिजन प्रो लॉन्च झाल्यानंतर मातांमध्ये असा विश्वास रूढ होऊ लागला आहे की, "त्यांची मुले पर्यावरणाकडे दुर्लक्ष देतील. निसर्गापासून दूर राहतील आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटमुळे त्यांचे लक्ष विचलित होईल," अहवालात म्हटले आहे.
दुसरीकडे, काही मातांना डिजिटल जग मुलांसाठी अधिक उपयुक्त वाटत आहे. अशा मातांनी त्यांच्या मुलांवर 51-85 टक्के खर्च डिजिटल माध्यमातील विविध वस्तू आणि सेवांसाठी केला आहे. जवळपास 20 टक्के डिजिटल जाणकार मातांनी 85 टक्क्यांहून अधिक खर्च केला, असे अहवालात म्हटले आहे. मातांच्या सर्वात विश्वासार्ह डिजिटल गोष्टींमध्ये अमॅझोन (खरेदीसाठी), स्विगी (खाण्यासाठी) आणि डिस्ने हॉटस्टार (मनोरंजनासाठी) यांचा समावेश आहे.