11.11 Wish and Its Meaning: 11:11 वर मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का? जाणून घ्या या  Special Number Combination बद्दल काही खास  गोष्टी!
11 11 Wish Come True (File Image)

आजची तारीख 11 नोव्हेंबर म्हणजेच 11:11 आहे. 11:11 या अंकाकडे अनेक जण शुभ संकेत म्हणूनही पाहतात. घडाळ्याच्या काटावरही 11:11 किंवा 1:11 असं दिसतं तेव्हा त्याचा संकेत 'Luck'म्हणून पाहिला जातो. या अंकामध्ये दैवी आणि शुभ संकेत असल्याने या वेळी तुमच्या मनातील आतला आवाज काय सांगतोय? हे जाणून घ्या. मागील काही वर्षामध्ये या वेळ आणि दिवसाची लोकप्रियता वाढली आहे. आयुष्यातील अनेक मोठे प्रसंग, क्षण या वेळेचं समिकरण करून सुरू करण्याची पद्धत आहे.

चीन मध्ये 11 नोव्हेंबर हा दिवस Singles' Day म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सिंगल असल्याच्या अभिमान बाळगला जातो. Alibaba या प्रसिद्ध शॉपिंग वेबसाईट वर देखील मोठी सूट ग्राहकांसाठी जाहीर केली जाते.

11/11 ची वेळ साधून मागितलेली इच्छा खरंच पूर्ण होते का?

घड्याळ्यात 11:11 ची वेळ दिसली की अनेक जण इच्छा बोलून दाखवतात आणि युनिव्हर्स प्रति कृतज्ञता व्यक्त करतात. अनेकजण यावेळी इतरांकडे त्याची वाच्यता करत नाहीत. ही इच्छा बोलून दाखवली तर ती पूर्ण होणार नाही अशीही काहींची धारणा आहे. 11 नंबर आणि 11:11 वेळेबाबत लक फॅक्टर आणि दैवी असण्याबाबत वेगवेगळे समज आहेत.

11/11 स्पेशल का?

अंकशास्त्र तज्ञ आणि नव्या युगातील फिलोसॉफर्स यांचं असं मत आहे 11:11 चा इव्हेंट हा नशिबाने किंवा योगायोगाने येतो. हा काही जण मानतात की शुभ संकेत आहे. काही जण presence of a spirit म्हणून त्याच्याकडे बघतात. 11 नोव्हेंबर 2011 दिवशी मोठ्या संख्येने लग्न पार पडली होती. या दिवशी जन्माला आलेल्या नवजात बालकांनाही मीडीयाकडून विशेष कव्हरेज देण्यात आले होते.

11 :11 ला इच्छा का मागितली जाते?

11:11 ची इच्छा लवकर manifest होते अशी धारणा आहे. या अंकासोबत psychic vibrations असतात. त्यामुळे लोकांना psychic awareness देण्यासाठी हा अंक वापरला जातो. त्याचे मानसशास्त्राचे निगडीतही सकारात्मक परिणाम आहेत.

11 हा अंक लकी आहे का?

11 हा नंबर angels शी निगडीत असल्याचं मानलं जातं. जेव्हा या angels 11 नंबरशी निगडीत काही मेसेज पाठवतात तेव्हा त्यासोबत धैर्य, प्रोत्साहनही असतं. spiritual enlightenment च्या दृष्टीने हा नंबर महत्त्वाचा आहे.

11 11 Wish Rules काय?

11 11 Wish करताना हातातली कामं सोडून स्वतःवर तो क्षण लक्ष केंद्रित करा. या क्षण अनुभवण्याचा कोणताही चांगला किंवा वाईट मार्ग नाही. त्यांच्या मनाप्रमाणे हा क्षण ते अनुभवू शकतात. यासाठी केवळ डिजिटल क्लॉक नाही तर नंबर प्लेट, पत्ता, रस्त्याचा क्रमांक किंवा कोणतेही कॉम्बिनेशन काम करू शकते.

(टीप: हा लेख केवळ माहिती देण्याच्या हेतूने लिहण्यात आला आहे. लेटेस्टली त्याची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.)