Winter Tips: हिवाळ्यात वापरण्यात येणारे स्वेटर, मफलर धुताना चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी अन्यथा त्वचेला होऊ शकते एलर्जी
Sweater (Photo Credits: PixaBay)

हिवाळा (Winter) म्हटला की वर्षभर जी गोष्ट कपाटाच्या ठेवली असते ती बाहेर निघते ते म्हणजे स्वेटर (Sweater) आणि मफलर (Muffler). लोकरीचे मऊ आणि उबदार स्वेटर थंडीत खूपच कामी येते. मुंबईत तीनही ऋतू हे समसमान असल्यामुळे सर्वच ऋतूंचा अनुभव येथे अनुभवायला मिळतो. या ऋतूमध्ये सर्वांना आवडणारा ऋतू म्हणजे हिवाळा. हिवाळा हा थंडीचा काळ. साधारण ऑक्टोबर हिट संपल्यानंतर हळूहळू थंडीची चाहूल लागते. मुंबईतील पावसाळा हा जितका आल्हाददायक वाटतो तितकाच हिवाळाही मुंबईकरांसाठी थंडावा देणारा असतो. या हिवाळ्यात आपण वेगवेगळ्या स्टाईल्सचे कपडे घालत असलो तरीही एक गोष्ट अजिबात विसरत नाही ती म्हणजे स्वेटर.

स्वेटर, मफलर हे मुख्यत्वे लोकरीपासून बनलेले असल्यामुळे त्याची तशा प्रकारची ठेवणही असली पाहिजे. ही कपडे खूप उबदार असल्यामुळे ज्यांच्या अंगात उष्णता आहे त्यांना या कपड्यांत खूप घाम येतो त्यामुळे स्वेटर, मफलर यांसारख्या कपड्यांना उग्र वास येतो. त्यामुळे आपण वारंवार हे कपडे धुतो. मात्र ते योग्य रितीने धुतले न गेल्यास त्या कपड्यांमधील उबदारपणा निघून जातो आणि त्याचे धागे निघून त्यावर धाग्यांचे गोळे बनतात. त्यामुळे हे कपडे धुण्यासाठी खालील गोष्टींचा विचार नक्की करा

1. ब-याचदा लोकरीच्या कपड्यांवर 'Only Dry Clean' अशी सूचना लिहिलेली असते. असे कपडे घरी न धुता ड्रायक्लीनसाठीच द्यावे. गरज नसताना कपडे ड्रायक्लीन केले तर खराबही होतात.

2. लोकरीचे कपडे धुण्यासाठी बाजारात खास जेंटल डिटर्जंट म्हणजेच सौम्य प्रकारची धुण्याची पावडर मिळते. तीच वापरावी. यामुळे कपड्यांची मऊपणा जात नाही.

हेदेखील वाचा- Winter Lips Care Tips: हिवाळ्यात या '5' घरगुती उपायांनी घ्या गुलाबी ओठांची काळजी

3. लोकरीच्या कपड्यांवर कसलाही डाग पडला असेल आणि लगेच काढण्यासारखा असेल तो त्वरित ड्रायक्लीनला द्यावा. अन्यथा तो डाग जिरला तर तो जाता जात नाही.

4. लोकरीचे कपडे वापरताना प्रत्येक वापरानंतर या कपड्यांवर 'ब्रिस्टल ब्रश' फिरवून घ्यावा. यामुळे लोकरीच्या कपड्यांच्या टाक्यांमध्ये अडकलेली धूळ-कचरा साफ होतो.

5. लोकरीचे कपडे धुऊन वाळवताना एक काळजी घ्यावी. कपडे पाण्यातून काढून लगेच वळणीवर वाळत घालू नयेत. मुळातच लोकरीचे कपडे खूप पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे ते जड होतात. ते तसेच वळणीवर टाकले तर त्या जडपणामुळे त्यांचा आकार बिघडू शकतो.

स्वेटर-मफलर-शाली कपाटात ठेवताना आधी ते ठेवण्याच्या जागी डांबर गोळ्या ठेवाव्यात. लोकरीचे कपडे कपाटात हँगरला लटकवून न ठेवता ते व्यवस्थित घडी घालून ठेवावेत.