Isha Ambani (Photo Credits: Instagram/ Vogue)

लोकप्रिय वोग मॅगझीन (Vogue Magazine) कव्हरवर अनेकदा बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागते. यंदा वोगच्या नव्या आवृत्तीच्या कव्हरवर ईशा अंबानी (Isha Ambani) झळकत आहे. यात ईशा क्लासी लूकमध्ये दिसत आहे. वोग इंडियाने इंस्टाग्राम अकाऊंटवर हा खास फोटो शेअर केला आहे. ईशा अंबानीच्या या क्लासी लूकला जबरदस्त लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

गेल्या वर्षाअखेरीस 12 डिसेंबरला ईशा बिजनेसमॅन आनंद पीरामलसोबत विवाहबद्ध झाली. मुंबईतील अंबानी हाऊसमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला.

लग्नापूर्वी उदयपूरमध्ये ईशा-आनंदचे दिमाखदार प्री वेडींग सेलिब्रेशन झाले. या सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, अभिषेक बच्चन, प्रियंका चोप्रा, निक जोनस, ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांसारख्या स्टार कलाकारांची मांदीयाळी या शाही विवाहसोहळ्यात पाहायला मिळाली.