सब्यसाचीने डिझाईन केलेल्या लेहेंग्यात खुलले ईशा अंबानीचे सौंदर्य (Photos)
ईशा अंबानी (Photo Credits: Instagram)

रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांची कन्या ईशा अंबानी (Isha Ambani) लवकरच बिजनेसमॅन आनंद पिरामलसोबत (Anand Piramal) विवाहबद्ध होणार आहे. 12 डिसेंबरला ईशा-आनंदचा शाही विवाहसोहळा पार पडेल. त्यामुळेच अंबानी कुटुंबात लगीनघाई सुरु आहे. यातच डिझाईनर सब्यसाची मुखर्जी (Sabyasachi Mukherjee) ने इंस्टाग्रामवर ईशाचे काही फोटोज शेअर केले आहेत.

ईशा अंबानीच्या घरी ग्रह शांती पूजा असल्याने हा सुंदर ड्रेस सब्यसाचीने डिझाईन केला होता. या ट्रेडिशनल लेहेंग्यासोबत ईशाने सब्यसाची ज्वेलरी देखील परिधान केली होती. या संपूर्ण लूकमध्ये ईशाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

तुम्हीही पाहा ईशाचे खास फोटोज:

 

ईशा-आनंद यांचा साखरपुडा इटलीतील कोमो लेक परिसरात पार पडला. आता लवकरच ईशाचा शाही लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे.