Sherika De Armas | (Photo Credit - Instagram)

Miss World Sherika De Armas Dies: माजी विश्वसुंदरी शेरीका डे आर्म्स हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या 26 वर्षांची होती. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून ती गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने (Ovarian Cancer) ग्रस्त होती. या आजारावरील उपचारासाठी तिच्यावर अनेक वेळा केमोथेरपी आणि रेडिओथेरपी करण्यात आली होती. उरुग्वे येथे 2015 मध्ये झालेल्या विश्वसुंदरी स्पर्धेत तिने आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ती केवळ सहभागीच झाली नव्हती तर मीस वर्ल्ड 2015 (Miss World 2015) चा किताबही तिने पटकावला होता. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर (2023) रोजी तिचा मृत्यू झाला. न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्ताचा हवाला देऊन जगभरातील प्रसारमाध्यमांनी तिच्या निधनाचे वृत्त दिले आहे.

Sherika De Armas हिच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांना आणि जगभरातील विविध क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. निधनाचे वृत्त देताना तिच्या भावाने इंग्रजीत 'X' पोस्ट करुन माहिती दिली. त्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, छोट्या बहिणीने कायमसाठी उंच झेप घेतली आहे. मी यूनिवर्स उरुगग्वे 2022 च्या कार्ला मूर्नोड म्हणाल्या मीस डे आर्म्स यांनी जगाला खूप काही दिले. माझ्या आयुष्यात आलेल्या अत्यंत सूंदर आणि प्रभावी व्यक्तींपैकी त्या एक होत्या. मिस उरुग्वे 2021 च्या लोला डे लॉस सँटोस यांनी म्हटले की, मला नेहमी तुझी आठवण येईल, फक्त तू मला दिलेल्या सर्व पाठिंब्यासाठीच नाही तर तुझ्या स्नेहासाठी, तुझा आनंदासाठी. तुझ्यामुळे जोडले गेलेले मित्र अजूनही माझ्यासोबत आहेत, अशी भावना त्यांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली म्हणाले.

सन 2015 मध्ये चीनमध्ये आयोजित मिस वर्ल्ड स्पर्धेत Sherika De Armas ही तरुणी तेव्हा टॉप 30 मध्ये नव्हती. मात्री ती, या स्पर्धेतील 18 वर्षांखालील केवळ सहा वर्षांच्या मुलीपैकी एक होती. स्पर्धा जिंकल्यानंतर त्या वेळी नेटउरुग्वेला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली. "मला नेहमीच एक मॉडेल व्हायचे होते. मग ती ब्युटी मॉडेल असो, जाहिरात मॉडेल असो किंवा कॅटवॉक मॉडेल असो. मला फॅशनशी संबंधित सर्व गोष्टी आवडतात आणि मला वाटते की सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचे कोणत्याही मुलीचे स्वप्न असते. आव्हानांनी भरलेला हा अनुभव मला जगता आल्याने मला खूप आनंद झाला आहे.

दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा स्त्रियांमध्ये चौथा सर्वात सामान्य कर्करोग आहे. "2018 मध्ये, जगभरात अंदाजे 570,000 महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि सुमारे 311,000 महिलांचा या आजारामुळे मृत्यू झाला