
दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि झगमगाटाचा सण. देशातला एकही कोपरा अंधकारमय नाही. अख्खा देश प्रकाशात न्हाऊन निघतो. तर दुसरीकडे दिवाळी म्हणजे फराळाचा उत्सव. चकल्या, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा, चिरोटे हे दणकून खाण्याचा सण. त्याचबरोबर दिवाळी असते ती अनेक प्रकारच्या नात्यांसाठी. भाऊ बहीण, पती पत्नी, अशा कित्येक नात्यांचा सोहळा म्हणजे दिवाळी. आणि उत्सव म्हटलं की पावलं सर्वात आधी वळतात ती म्हणजे कपड्यांच्या दुकानाकडे. पारंपरिक पेहराव परिधान करण्यामागे प्रत्येक जण लागलेला असतो. झब्बा, कुर्ता आणि त्याचे अनेक प्रकार घेण्याकडे जास्ती कल असतो. चला तर मग बघूया, यंदा कुठले कुठले पर्याय उपलब्ध आहेत कपड्यांमध्ये.
1. ललित प्रभाकर (Lalit Prabhakar)
ह्या सिम्पल कुर्त्याने तुम्ही दिवाळीची सुरवात करू शकता.

2. सिद्धार्थ चांदेकर (Siddarth Chandekar)
छानपैकी नक्षीकाम केलेला हा कुर्ता नरक चतुर्दशीच्या सकाळसकाळ पहिली अंघोळ उरकून बाहेर फिरायला जाताना तुम्ही घालू शकता.

3. स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi)

4. अमेय वाघ (Amey Wagh)
काही संदेश किंवा एखाद्या गाण्याच्या दोन ओळी, एखादी म्हण लिहिलेले टी शर्ट्स आणि शर्ट्स नंतर त्याच स्टाईलचा हा कुर्ता सुद्धा तितकाच आकर्षित करणारा आहे. पाडव्याच्या दिवशी असच एखादं मजेशीर वाक्य असलेला कुर्ता तुम्ही घालू शकता.

5. सुबोध भावे (Subodh Bhave)
काहीश्या वेगळ्या पॅटर्नचा असा हा कुर्ता. बटणांची जागा काहीशी बाजूला आणि थोडासा पठाणी स्टाईलचा हा कुर्ता तुम्ही भाऊबीजेला परिधान करू शकता.

या मराठी सेलिब्रिटींनी परिधान केलेल्या कुर्त्यांचे प्रकार ट्राय करा आणि मस्त तामझामात दिवाळीत बाहेर पडा. कारण दिवाळीत मिरवण्याची मजाच काही और आहे. या ऍक्टर्सच्या इंस्टाग्रामवरून घेतलेल्या ह्या फोटोंव्यतिरिक्त तुम्हाला अजून काही पर्याय हवे असतील तर या सर्व सेलिब्रिटींच्या अकाउंट वर तुम्ही चेक करू शकता.