COVID19 Wave: देशात कधी येणार कोरोनाची नवी लाट? कोविड टास्क फोर्स अधिकाऱ्यांनी दिली ही माहिती
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID19 Wave: कोविड19 टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नव्या लाटेसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले की, जर कोरोनाचा नवा वेरियंट येणार असेल तरच त्याची लाट येत्या 6-8 महिन्यात येऊ शकते. तसेच त्यांनी असा ही दावा केला की, जरी ओमिक्रॉनचा सब-वेरियंट बीए2 हा बीए1 च्या तुलनेत अधिक संक्रमित आहे. परंतु तो संभाव्य आगामी लाटेचे कारण ठरणार नाही. त्यांनी पुढे असे म्हटले की, जोपर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग कमी आहे तोवर आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे तो व्हायरस आसपासच आहे. म्हणजेच या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक शक्य असेल तो प्रयत्न केला पाहिजे.

ओमिक्रॉन BA2 च्या कारणामुळे कोरोनाची आणखी एक लाट येण्याच्या शक्यतेसंदर्भात बोलताना अधिकाऱ्यांनी म्हटले की, BA2 हा त्या लोकांना संक्रमित करत नाही ज्यांना याआधी कोरोनाच्य BA1 सब वेरिटंचे संक्रमण झाले होते.(Lassa Fever: लासा तापामुळे ब्रिटनमध्ये पहिला मृत्यू, काय आहेत या आजाराची लक्षणे जाणून घ्या?)

डॉ. जयदेवन यांनी ANI यांना असे सांगितले की, ओमिक्रॉनचा सब-वेरियंट बीए2 मुळे आणखी एक लाट येऊ शकते. बीए2 हा बीए1 झालेल्यांना संक्रमित करण्यास सक्षम नसणार आहे. तसेच तो कोणता नवा व्हायरस किंवा स्ट्रेन नाही आहे. बीए2 ओमिक्रॉनचाच एक सब-वेरियंट आहे.

डॉ. जयदेव यांनी असे ही म्हटले की, ओमिक्रॉन प्रमाणेच भविष्यात कोरोना वेरियंट सु्द्धा वॅक्सीन इम्युनिटी गुण दाखवू शकते. तसेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोना व्हायरस आपली ताकद वाढवण्यासाठी सातत्याने विकसित झाला आहे. त्याची अधिक लोकांना संक्रमित आणि नैसर्गिक प्रतिकारशक्ती, लसीकरण प्रतिकारशक्तीला पराभूत करण्याची त्याची क्षमता आहे.”