![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/chandra-grahan-784x441-380x214.jpg)
Chandra Grahan 2021: यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण येत्या 26 मे 2021 रोजी असणार आहे. या दिवशी वैशाख पौर्णिमा असणार आहे. यावेळचे चंद्रग्रहम उपछाया चंद्र ग्रहण असणार आहे. यामुळे सुतक काळ मान्य नसणार आहे. हा दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी सुरु होणार असून संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी संपणार आहे. ज्योतिषांनुसार व्यक्तिच्या आयुष्यात ग्रहांचे फार महत्व आहे. आयुष्यात चांगली किंवा वाईट गोष्टी सुद्धा या ग्रहांवर सुद्धा अवलंबून असतात.
तर ग्रहणात सुद्धा सर्व राशींवर वेगवेगळा प्रभाव पडतो. यंदा असणाऱ्या चंद्रग्रहणामुळे काही राशींमधील व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर जाणून घ्या कोणत्या राशींमधील व्यक्तींना धनलाभ होणार आहे.(June 2021 Shubh Muhurat: दुकान, कार्यालय आणि कारखान्याच्या उद्घाटनसाठी जून महिन्यातील 'या' तारखा ठरतील शुभ, वाचा सविस्तर)
मेष- या राशीमधील व्यक्तींना अप्रत्यक्षरित्या पैसे मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव राहिल. स्वत:सह आईच्या आरोग्याची काळजी घ्या. दीर्घकाळापासून थांबलेला प्रोजेक्ट पुन्हा एकदा सुरु होईल. आपल्या प्रियजनांसोबत उत्तम संबंध निर्माण करा.
वृषभ- वृषभ राशीमधील व्यक्तींना चंद्र ग्रहणादरम्यान आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत अधिक खर्च सुद्धा होऊ शकतो. यासाठी बजेट तयार करुन ठेवा. वैवाहिक आयुष्यात मतभेदांचा सामना करावा लागू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन- यंदाचे चंद्रग्रहण मिथुन राशीतील व्यक्तींना शुभ फळ देणार आहे. या दरम्यान, दुसऱ्यांच्या तर्क-वितर्क करण्यापासून सावध रहा. काही अप्रत्याशित घटनांचा सामना करावा लागू शकतो.
कर्क- या राशीतील लोकांना व्यापारात लाभ मिळू शकतो. दुसऱ्यांच्या बोलण्याशी सहमत होण्यापासून दूर रहा. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण किंवा पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. यासाठी सावधगिरी बाळगा.
सिंह- या राशीतील लोकांवर चंद्र ग्रहणाचा अनुकूल प्रभाव पडणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्रांसोबत वेळ घालवणे उत्तम ठरेल. तणाव आणि चिंतेपासून दूर रहा.
कन्या- कन्या राशीमधील व्यक्ती आकर्षणाचा केंद्र बनू शकतात. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. भाग्य अधिक मजबूत होण्यासह आर्थिक लाभ होईल. घाईघाईत घेतलेल्या निर्णयांपासून सावध रहा.
तुळ- या राशीमधील व्यक्तींचे आर्थिक नुकसान होऊ शकते. पैसे उधारीवर देण्यापासून दूर रहा. कोणत्याही नव्या कामात गुंतवणूक करण्यापासून सावध रहा. प्रेम संबंधात गोडी येईल.
वृश्चिक- वृश्चिक राशीमधील व्यक्तींचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव वाढण्यापासून दूर रहा. त्याचसोबत वाद-विवाद आणि मतभेद होण्यापासून बचाव करा. मेडिटेशन केल्यास मानसिक तणाव दूर होईल.
धनु- या लोकांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आपल्या भावना योग्य रितीने व्यक्त करा. आर्थिक नुकसान होईल.
मकर- या राशीतील व्यक्तींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. यशाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. पार्टनर सोबत संबंधत अधिक उत्तम होतील. धैर्य ठेवा.
कुंभ- कुंभ राशीतील लोकांना व्यापारात चढउतारचा सामना करावा लागणार आहे. हा काळ तुमच्यासाठी उत्तम नसल्याने कार्यालयाच्या ठिकाणी सुद्धा समजूतदारपणे वागा. प्रवास करणे टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.
मीन- नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाद करण्यापासून दूर रहा. बातचीत करुन चुकीचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करा.