Beauty salon: येत्या नवं वर्षात ब्यूटी पार्लरचा खर्च 25 टक्क्यांनी वाढणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

येत्या नव्या वर्षात ब्यूटी पार्लरचे खर्च 25 टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच महाराष्ट्र नाभिक महामंडळ आणि सलून- ब्यूटी पार्लर असोसिएशन यांनी हा निर्णय घेतला आहे.

दादर येथे वीर कोतवाल उद्यानात स्वातंत्र्यसेनानी भाई कोतवाल यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी महामंडळ व असोसिएशनचे पदाधिकारी जमले होते. त्यावेळी महामंडळाच्या सभागृहातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय अनारसे यांनी असे सांगितले की, प्रत्येक हेअर स्टाईलिस्ट सलून व ब्युटी पार्लरच्या प्रकारानुसार दर आकारतात. त्या दरांमध्ये चक्क दोन वर्षांनंतर कमाल २५ टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी महामंडळ व असोसिएशनने दिली. सलून व ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण म्हणाले की, सौंदर्य प्रसाधनांसहित महागाई वाढल्यानेच दोन वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात आली आहे.

तसेच ब्यूटी पार्लरच्या ब्रँडेड कंपनीचे सौंदर्य प्रसाधनांवरील 28 टक्के जीएसटी वाढल्याने हा निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.तर पार्लरसाठी लागणारे इतर साहित्य आण दुकाने भाडे जास्त प्रमाणात आकारले जात असल्याने या निर्णयाची पुष्टी करण्यात आली आहे.