Happy Diwali 2019 HD Images (Photo Credits: File Image)

दिवाळी आली की सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. ठिकठिकाणी दिव्यांची मांदियाळी असते. अख्ख्या परिसराला एका सोहळ्याचं रूप आलेलं असतं. भाऊबीज हा दिवस त्यातला खास दिवस. भावंडं कुठेही असली तरीही वेळात वेळ काढून या दिवशी एकमेकांना भेटतात आणि दणक्यात भाऊबीज साजरी करतात. गोडधोड, फराळ, कपडे सगळ्या गोष्टींची चंगळ असते. पण या वेळी प्रश्न पडतो तो हा की एकमेकांना गिफ्ट काय द्यायचं. चला तर मग बघूया यंदा ओवाळणीच्या ताटात तुम्ही काय नजराणा टाकू शकता ते.

1. चॉकलेट्स (Chocolates)

भाऊबीज म्हटली की चॉकलेट्स पर्यायाने येतातच. चॉकलेट्सचं पॅकेट हे आता एक आदर्श गिफ्ट होऊन गेलय. एक मोठा चॉकलेटचा बॉक्स आणून सर्व नातेवाईकांमध्ये वाटून खाण्याचा मजा काही औरच आहे. एका ताटात मस्तपैकी चकल्या चिवडा घ्यायचा, दुसऱ्या ताटात लाडू आणि सगळं खाऊन झाल्यावर एक तुकडा चॉकलेट!

Chocolates (File)

2. पर्स (Purse)

पर्स आणि स्त्रियांचं अतूट नातं हे आहे. काही जीवनावश्यक वस्तूंमध्ये पर्सच नाव घेता येईल. कारण आपला अख्खा संसार त्या देवदूष्यं गोष्टींमध्ये माववण्याचं कौशल्य स्त्रीच्या अंगात मूलभूत असतं. आणि म्हणूनच पर्स ही अत्यंत प्रिय असणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट. त्यामुळे पर्स हे गिफ्ट कधीही आवडण्यासारखं.

Purse (File)

(हेही वाचा. Padwa Gifts Ideas 2019: पाडव्या निमित्त बायकोला ओवाळणीत देण्यासाठी मदत करतील या '5' भन्नाट गिफ्ट आयडियाज)

3. कॉफी मग (Coffee Mugs)

छान पाऊस पडत असेल, किंवा मस्त मित्रमंडळी, पाहुणे आले आहेत, आणि गप्पांमध्ये रात्र कशी सरली ह्याचा अंदाजच आला नाही, अशा वेळी फर्माईश होते ती मस्त गरम गरम कॉफी ची. आणि कॉफी पिण्याची खरी मजा ही मस्त मोठ्या मगातून पिण्याचीच आहे. त्यामुळे कॉफी मगातून कॉफी पिताना हमखास आपल्या भावाची आठवण येईल असं हे गिफ्ट.

Coffee Mug (File)

4. दागिना (Jewellary)

दागिना ही स्त्रियांची सर्वात आवडती गोष्ट. दागिना परिधान केल्यानंतर एखाद्या स्त्रीचं खुलणारं सौंदर्य सुद्धा याच गोष्टीची ग्वाही देत असतं. एखादा अलंकार शरीरावर चढवल्यानंतर स्त्रीचं सौंदर्य हे आरस्पानी भासतं. त्यामुळे एखादा पेंडंट, पैंजण किंवा कुठल्याही प्रकारचा दागिना हे उत्तम गिफ्ट.

Jewellary (Wikimedia)

(हेही वाचा. Happy Diwali 2019 In Advance: दिवाळीच्या मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!)

5. कपडे (Clothes)

सर्वात महत्वाचं म्हणजे कपडे. चॅन चॅन कपडे विकत घेऊन परीधान करणं ही अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी गोष्ट. सणावारी तर नवनवीन पारंपरिक पद्धतीचे तर काही नव्या ट्रेंड्सचे कपडे खरेदी करून मस्त पैकी मिरवणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुळातच नटणं हा मनुष्याचा स्थायीभाव आहे. त्यामुळे एखादी साडी, कुर्ता, किंवा कुठल्याही नवीन पद्धतीचा कपडा हे गिफ्ट खूप मोहात पाडणारं ठरू शकतं.

Clothes (File)