Delhi Murder Case: आईस्क्रिम विकणाऱ्या तरुणाची हत्या, अल्पवयीन मुलीसह दोघांना अटक
Arrest | (Representative Image)

Delhi Murder Case: दिल्लीतील इंडिया गेटजवळ एका आईस्क्रिम विकणाऱ्या तरुणाची हत्या केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीसह दोघांना अटक केले आहे. दिल्ली पोलिसांनी या हत्या प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांत छडा लावून शोधले आहे. प्रभात असं मृत व्यक्तीचे नाव आहे. तो दिल्लीतील इंडिया गेट जवळ आईस्क्रिम विकणाचे काम करत असायचा. दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी होता. तो मुळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी होता. हेही वाचा-प्रॉपर्टीच्या वादामधून वडिलांनीच दिली पोटच्या पोराला मारायला 75 लाखांची सुपारी

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री 9च्या सुमारास कर्तव्यपथ पोलिस ठाण्यात फोन आला. फोनवर इंडिया गेटवर मारामारी चालू असल्याचे सांगितले. यावरून पोलिस पथक इंडिया गेटजवळ पोहचले आणि त्याने पाहिले की, एक जण रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता. पोलिसांनी त्याला तात्काळ लेडी हार्डिंग रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. चाकूने पोटात वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. 

पोलिसांना माहिती मिळाली की, एका 20 वर्षीय तरुणाने त्याच्या पोटात चाकूने वार केले. प्रभासचा फोन घटनास्थळावरून गायब होता. पोलिसांनी तीन वेगवेगळे पथक तयार केले. एकाने टीमने फोनचा तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली त्यावेळी प्रभासचे 16 वर्षीय मुलीसोबत संबंध असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुलीचा शोध घेत दोन आरोपींना ताब्यात घेतले.

प्रभासपासून सुटका हवी म्हणून मुलीने आणि आरोपींने त्याची हत्या केली अशी पोलिस ठाण्यात आरोपींने कबुल केले. आरोपी मुलगी उत्तर प्रदेशात अजय नावाच्या तरुणाकडे होती. पोलिसांनी अजयकडून प्रभासचा फोन जप्त केला. अल्पवयीन मुलीची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.