प्रॉपर्टीच्या वादामधून वडीलांनीच पोटच्या पोराची 75 लाखांची 'सुपारी' दिल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी वडीलांना अटक केली आहे. सोबतच अन्य 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. India Today च्या वृत्तानुसार, पुण्याचे पोलिस कमिशनर अमितेश कुमार ( Amitesh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, Dineshchandra Argade या वडिलांनी मुलाची सुपारी दिली होती. Dineshchandra Argade हे रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. मुलाच्या बेताल वागणूकीला ते वैतागले होते. मुलगा Dheeraj Argade याच्या वागणूकीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता त्यामधून त्यांनी हा निर्णय घेतला.
16 एप्रिल दिवशी दुपारी 3.30 च्या सुमारास बाईक वरून आलेल्या दोन मारेकरांनी Dheeraj Argade वर जंगली महाराज रोड वरील Argade Heights building जवळ गोळीबार केला. धीरज या हल्लामधून बचावला आहे. नंतर धीरज याच्याकडून शिवाजी नगर पोलिस स्टेशन मध्ये FIR नोंदवण्यात आला. त्याच्या आधारे crime branch ने तपास सुरू केला. नंतर पोलिसांकडून धीरजचे वडील आणि 5 अन्य आरोपींना अटक केली. प्रशांत घाडगे, अशोक ठोंबरे, प्रवीण कुडले, योगेश जाधव, चेतन पोकळे अशी अन्य आरोपींची नावं आहेत. कुडले हा कोथरूड परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत.
तपासादरम्यान दिनेशचंद्र अरगडे यांच्यात कौटुंबिक बाबी आणि मालमत्तेवरून वाद असल्याचे समोर आले. मुलगा धीरजला मारण्यासाठी आरोपी वडीलांनी ७५ लाख रुपये 'सुपारी' म्हणून दिल्याचे समोर आले. दिनेशचंद्र अरगडे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. मागील महिन्यात आरोपीने चाकूचा वापर करून मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत राउंड, फूड डिलिव्हरी बॉय टी-शर्ट (अटक टाळण्यासाठी), बनावट वाहन नंबर प्लेट आदी साहित्य जप्त केले आहे.