Young Temple Priest Killed: एका तरुण पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहारच्या गोपालगंज येथे हत्या करण्यात आली आहे.मागील सहा दिवसांपासून पुजारी बेपत्ता होता. स्थानिक पोलिसांना बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती. सहा दिवसानंतर पुजारीचा विकृत अवस्थेत मृतदेह आढळून आला. मनोज कुमार (22)असे मृत पुजाऱ्याचे नाव असून तो गोपालगंज येथील शिव मंदिरात आहे. धक्कादायक म्हणजे मारेकऱ्यांनी पुजाऱ्याचे दोन्ही डोळे काढल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोनी कोयनी दानापूर गावात पुजाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने संतप्त रहिवाशांनी पोलिसांवर दडगफेक केला. धक्कादायक म्हणजे, पुजाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचे दोन्ही डोळे काढण्यात आले, त्याचा प्रायव्हेट पार्टही कापण्यात आला होता आणि त्याची जीभही मारेकऱ्यांनी कापल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संपप्त व्यक्त केला. पोलिसांवर दगडफेक देखील केला. (हेही वाचा- शेतीच्या वादातून वहिणीची हत्या, 14 दिवसानंतर सापडला कुजलेला मृतदेह
गावकऱ्यांनी रस्ता रोखून आंदोलन देखील केलं आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह नेण्यासही गावकऱ्यांनी नकार दिला. या भीषण हत्येतील पीडितेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी माढा पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जमावाला थांबवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबारही केला.आरोपी संदर्भात कोणतीही माहिती समोर आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.