Yavatamal Crime: महाराष्ट्र राज्यातील यवतमाळमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मंगरुळ येथील एक महिला मागील 14 दिवसांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीनं या संदर्भात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी विषय गांभीर्याने घेऊन महिलेचा कसून तपसा सुरु केला. धक्कादायक म्हणजे पोलिसांनी तपासल्यानंतर बेपत्ता (Missing) महिलेचा मृतदेह आढळून आला. 14 दिवसांनी महिलेचा मृतदेह (Deathbody) उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेनंतर संपुर्ण जिल्हा हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलिसांनी महिलेचा मृतदेह शोधून काढला. एका उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह कुजलेला अवस्थेत सापडला. महिलेच्या दिरानं हत्या केल्याचे समोर आले आहे, शेतीच्या वादातून हत्या केल्याचे समोर आले आहे. साधना संजय जोगे असं मृत महिलेचे नाव आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे असं आरोपीचे नाव आहे. महिलेचे पती संजय जोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
३० नोव्हेंबर रोजी महिला आपल्या शेतात शेंगा तोडण्यासाठी गेली होती परंतु संध्याकाळी ती घरी परतली नाही त्यामुळे पतीने या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार केली. स्थानिक पोलिसांनी महिलेची कसून तपासणी केली त्यानंतर महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी महिलेसंदर्भात घरच्यांची चौकशी केली तेव्हा दिराने तिचा खून केल्याचे समोर आले. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून तसेच एक एकर शेती विक्री करण्यास अडथळा आणत असल्यानं हत्या केल्याची कबुली महिलेच्या दिरानं दिली.