Lift Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Delhi: बवाना इंडस्ट्रियल एरियातील कारखान्यात लिफ्टमध्ये अडकून एका तरुणाचा मृत्यू (Death) झाला. आलोक असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. आलोक हा होलंबी कलान मेट्रो विहार येथील रहिवाशी आहे. लिफ्टमध्ये अडकल्याने (Lift Accident) आलोकचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा दावा असला तरी फॅक्टरीच्या फोरमनने आलोकला लिफ्ट चालवण्यासाठी पाठवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. एनआयए पोलीस स्टेशनने मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आलोक लिफ्टच्या शाफ्टमध्ये काय करायला गेला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एनआयए पोलिस स्टेशनला रविवारी दुपारी 4 वाजता लिफ्टमध्ये तरुण अडकल्याची माहिती मिळाली होती.

पोलीस कर्मचार्‍यांनी आलोकला लिफ्टमधून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपासादरम्यान असे आढळून आले की, आलोकची आई कूलर बनवणाऱ्या कारखान्यात हेल्पर म्हणून काम करते. होलंबी कलानमध्ये ती पती, पाच मुली आणि एक मुलगा आलोक यांच्यासोबत राहते. आलोक आईसोबत कारखान्यात गेला होता. खेळता खेळता तो फॅक्टरी लिफ्टच्या शाफ्टपाशी पोहोचला आणि यादरम्यान कोणीतरी लिफ्टचे बटण दाबले. त्यामुळे लिफ्टच्या मध्यभागी अडकून आलोकचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Lift Accident In Mumbai : लिफ्टमध्ये अडकलेल्या 26 वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू; मुंबईच्या मालाड येथील नामांकीत शाळेतील घटना)

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. दुसरीकडे आलोक हा त्याची आई कमला देवीसोबत कारखान्यात यायचा, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यादरम्यान तो आईसोबत बसायचा. तसेच आलोककडून किरकोळ कामे करून घेतली जात होती. तथापी, गेल्या काही दिवसांपासून लिफ्ट सुरू करण्यासाठीही त्याचा वापर केला जात होता. त्यावर आईनेही आक्षेप घेतला होता.

रविवारीही तो आईसोबत बसला होता. यादरम्यान फोरमॅनने 14 वर्षीय आलोकला लिफ्ट सुरू करण्यास सांगितले. त्याने लिफ्ट सुरू करताच अचानक लिफ्ट वरून खाली आली. लिफ्टमध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.