Lift Accident | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

St. Mary's English School Malad Mumbai: लिफ्टमध्ये अडकून मुंबई शरहारीतल एका नामांकीत शाळेतील शिक्षिकेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. मालाड येथील सेंट मेरी इंग्लिश स्कूल येथे ही घटना घडली. जेनेली फर्नांडिस असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. त्या केवळ 26 वर्षांच्या होत्या. या घटनेमुळे एकदा विविध इमारती आणि शाळांमधील लिफ्ट, त्याचा वापर, सुरक्षा आणि देखभाल यांसारखे अनेक प्रश्न पुन्हा एकदा नव्याने चर्चेला आले आहेत. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सेंट मेरी इंग्लिश स्कूल मालाड परिसरातील अत्यंत नामवंत म्हणन ओळखले जाते. या शाळेत जेनेली फर्नांडीस या जून 2022 मध्ये ऋजू झाल्या. त्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांमध्ये त्यांच्यासोबत दुर्दैवी घटना घडून मृत्यू आला. शाळेच्या सहाव्या मजल्यावरील वर्गाचा तास संपवून जेनेली दुसऱ्या मजल्यावरील वर्गाचा तास घेण्यासाठी निघाल्या होत्या. या वेळी जिन्याचा वापर न करता त्यांनी लिफ्ट वापरली. जेनेली लिफ्यमध्ये गेल्या मात्र लिफ्टचा दरवाजा पूर्ण बंद होण्यापूर्वीच लिफ्ट सुरु झाली. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. हा प्रकार घडताना त्यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून सुरक्षा रक्षक तातडीने घटनास्थळी आले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. (हेही वाचा, Mumbai: मुंबईतील सिद्धेश ज्योती इमारतीतील तळमजल्यावर लिफ्ट कोसळल्याने दोन जण जखमी)

शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, सुरक्षारक्षक यांनी मोठ्या संख्येने लिफ्टच्या दिशने धाव घेतली. त्यांनी लिफ्टमधून जेनेली फर्नांडीस यांना बाहेर काढले. मात्र, त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तातडीने लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्या मृत आढळून आल्या. डॉक्टारांनी तसे जाहीर केले. घडल्या प्रकारामुळे शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि इतरही लोक घाबरुन गेले आहेत. जनेली यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, शाळेत वापरण्यात येणारी लिफ्ट नियमांचे पालन करुन वापरण्यात येत होती का, त्यासाठी आवश्यक कायदेशीर पुर्तता आणि परवानग्या घेण्या आल्या होत्या काय, लिफ्टची योग्य वेळेस देखभाल करण्यात येत होती का या सर्व गष्टींचा तपास आता करण्यात येणार असल्याचे समजते.