NASA Alert: चिंताजनक! वर्षाअखेरीस अंतराळातून पृथ्वीवर येणार आणखी एक संकट; नासाकडून इशारा
Asteroid (Photo Credit: NASA)

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना महामारी संपूर्ण जगभरात थैमान घातले आहेत. एकीकडे कोरोना संकटापासून बचाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न केले जात असताना जगासमोर आणखी एक आव्हान पुढे येत आहे. वर्षाअखेरीस अंतराळातून पृथ्वीवर आणखी एक संकट येणार असल्याचा इशारा नासाने (NASA) दिला आहे. एक उल्का पृथ्वीच्या दिशेने येणार आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या उल्काचा आकार लहान नसून जगातील सर्वांत उंच म्हणून ओळखली जाणारी दुबई बुर्ज खलिफा इमारती एवढी असण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महत्वाचे म्हणजे, 2020 या वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. हवामानातील बदल, चक्रीवादळ आणि कोरोनासाऱ्या भयंकर विषाणूने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना आता 29 नोव्हेंबरला पृथ्वीच्या दिशेने उल्का येत असल्याचे माहिती नासाने दिली आहे. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक उल्केवर वैज्ञानिक लक्ष ठेऊन आहेत. नासाची सेंट्री सिस्टिम आधीपासून अशा संकटावर लक्ष ठेवून आहे. पुढच्या 100 वर्षात अशाप्रकारचे २२ उल्के पृथ्वीच्या दिशेने येणार असल्याचे नासाने सांगितले आहे. हे देखील वाचा-Jellyfish Swarms Invade Goa Beaches: गोव्याच्या समुद्र किनारी जेलीफिशची दहशत; Baga, Calangute, Candolim व Sinquerim बीचजवळ स्टिंगच्या 90 प्रकरणांची नोंद

पृथ्वी आणि चंद्रामधील सरासरी अंतर 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे. मात्र, नासाने या अंतरातील सुमारे 20 पट श्रेणती येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्यास प्राधान्य दिले आहे. नासाच्या प्लॅनेटरी डिफेन्स नेटवर्कच्या मते, यानंतर येणाऱ्या सर्व उल्का पृथ्वीपासून 46.5 मैलांपेक्षा कमी अंतरावरून जाणार आहेत, अशी माहिती एका हिंदी बेवसाईटने दिली आहे.