Karnataka Shocker: कर्नाटकातील कोप्पलमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीला मारहाण; 6 आरोपींना अटक
Gang Rape प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Karnataka Shocker: कर्नाटकातील (Karnataka) कोप्पल (Koppal) मधून एक लाजिरवाणी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गंगावती भागात सहा जणांनी 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला आणि तिच्या पतीला मारहाण केली. या घटनेत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. 8 आणि 9 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा पती घरी जाण्यासाठी बस स्टॉपवर थांबले होते. घरगुती वादातून दोघांमध्ये भांडण झाले होते. हळुहळू दोघांमधील वाद अधिकच वाढू लागल्याने सहा जणांनी मध्यस्थी केली. यानंतर त्यांनी जोडप्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. (हेही वाचा -Buldhana Gang Rape: बुलढाण्यात आठजणांनी महिलेवर केला बलात्कार; आरोपी 45 हजार घेवून फरार, परिसरात खळबळ)

सर्व आरोपींना अटक -

9 फेब्रुवारी रोजी महिलेने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांनी तिला ओढले आणि तिच्या पतीला मारहाण केली. एका आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी महिलेचा खूप छळ केला. आम्ही पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे असून 9 फेब्रुवारी रोजीच या घटनेत सहभागी असलेल्या सर्व सहा जणांना अटक केली आहे. (हेही वाचा - Rajastan Gang Rape: नोकरी देण्याच्या बहाणे 20 महिलांवर सामुहिक बलात्कार, राजस्थानमध्ये खळबळ)

लिंगराजा, मौला हुसेन, शिवकुमार स्वामी, प्रशांता, महेश आणि मधेश अशी पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली आहे. या घटनेप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आली आहे. एक महिन्यापूर्वी हंगल, हावेरी जिल्ह्यात घडलेल्या अशाच घटनेत, पुरुषांच्या एका गटाने जोडप्यावर हल्ला केला होता. त्यानंतर महिलेने सामूहिक बलात्काराचा बळी असल्याचा दावा केला. पोलीस सध्या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करत आहेत.