प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)
नवी दिल्लीमध्ये एका तरुणीने जातीबाह्य लग्न केल्याने तिच्या घरच्य मंडळींनी तिला चक्क सात वर्षे डांबून ठेवल्याची घटना घडली आहे. तर या तरुणीने या परिस्थितून बाहेर येण्यासाठी घरातील मंडळींच्या तावडीतून कसेबसे सूटून याची तक्रार महिला आयोगाकडे केली आहे.
कॉलेजमधील एका तरुणासोबत हिचे प्रेमसंबंध जुळले होते. तसेच या तरुणीने घरच्यांचा विरोधात पळून जाऊन २०११ रोजी लग्न केले. मात्र लग्नाच्या काही दिवसातच तिच्या वडिलांनी या तरुणीला फोन करुन आई गंभीर आजारी असल्याचे कळवले. त्यामुळे तरुणी घाबरुन माहेरी आली. मात्र घरी पोहचल्यावर आई गंभीर आजारी नसल्याचे तिने पाहिले. तेव्हा घरातील मंडळींनी तिच्या नवऱ्याला फोन करुन बायको परत तुझ्या घरी येणार नाही असे सांगितले. तसेच त्याला धमकावत बायकोची हत्या करु असे सांगून बळजबरीने घटस्फोट देण्यास भाग पाडले.
या घटनेमध्ये तरुणीच्या घरतील मंडळींनी तिला एका खोलीत चक्क सात वर्षे डांबून ठेवले होते. मात्र घरच्यांचा तावडीतून सुटका करुन घेतली. त्यानंतर तिने प्रथम नवऱ्याच्या मदतीने महिला आयोग आणि पोलिसांमध्ये घरातील मंडळींविरुद्ध तक्रार केली आहे.