Uttar Pradesh Crime: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केली हत्या, आरोपी पती फरार,युपीतील घटना
Uttar Pradesh Crime News

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या मुस्तफाबाद कॉलनीत लोणी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून पतीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना (31 मार्च) रविवारी घडली आहे. पतीने चार मुलांसमोरच पत्नीची हत्या केली. पत्नीवर धारदार फावड्याने हल्ला केला. अयुब्ब असं आरोपीचे नाव आहे. पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहे. हेही वाचा- सॉरी दीदी, मला जावे लागेल', लैंगिक अत्याचार पीडित विद्यार्थिनीची कॉलेज इमारतीवरून उडी घेत आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी फोनवर व्यस्त होती त्यावेळी अचानक पती आला आणि त्याने मुलांसमोरच पत्नीची हत्या केली. दरम्यान त्यांच्या मोठा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता.हत्या केल्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला. डोळ्यासमोर आईची हत्या झाल्याचे पाहून मुलांनी हंबरडा फोडला. आईला घेरले आणि भीतीने, घाबरून रडू लागले.

थोड्याच वेळाने मोठा मुलगा घरी आला तेव्हा पाहिले की, आई रक्ताने माखलेली जमिनीवर निपचित पडून आहे. हे पाहून त्याने मोठ्या मोठ्याने आरडाओरड केला. या घटनेची माहिती शेजारच्यांना सांगितले आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आले. पोलिसांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके नेमली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने अयुब्बने फोवड्याने हल्ला करत तीची हत्या केली.