Rajasthan Shocker: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या, पत्नीसह तिच्या 2 प्रियकरांना अटक
Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

अनैतिक संबंधात (Immoral Relationship) अडथळा ठरणाऱ्या पतीची (Husband) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना राजस्थानच्या (Rajasthan) बारमेर (Barmer District) जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पत्नीसह (Wife) तिच्या दोन प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

युसूफ खान असे मृत व्यक्तीचे नाव आहेत. युसूफचे काही वर्षांपूर्वी जरीना बानोशी लग्न झाले होते. दरम्यान, जरीनाचे त्यांच्यात नात्यातील अलाउद्दीन खान आणि बरकत खान यांच्याशी अनैतिक संबंध होते. याची माहिती युसूफला कळाल्यानंतर जरीनाने अलाउद्दीन आणि बरकतच्या मदतीने पतीला ठार करण्याचा कट रचला. त्यानुसार, 2 ऑगस्ट रोजी अलाउद्दीन आणि बरकत यांनी युसूफला त्यांच्याजवळ बोलावून घेतले. त्यानंतर युसूफला निर्जनस्थळी नेऊन त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हत्येनंतर अलाउद्दीन आणि बरकत युसूफचे मृतदेह बालोतरा कस्बेच्या मुद्रारोड येथील कामाक्षी महाविद्यालयाच्या आवारात नेऊन फेकला. हे देखील वाचा- Bihar Grampanchayat Election 2021: बिहारमध्ये ग्राम पंचायतीच्या माजी प्रमुखाची केली हत्या, मुस्रीघरारी परिसरात अज्ञातांनी झाडली गोळी

दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी सकाळी रस्त्यातून जाणाऱ्या लोकांना युसूफचा मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी पंचनामा केला आणि युसूफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवला. तसेच या घटनेचा तपास करीत पोलिसांनी अलाउद्दीन आणि बरकत या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी युसूफच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार ही हत्या करण्यात आल्याचे दोघांनी कबूली दिली. पोलिसांनी या दोघांसह जरीनालाही अटक केली आहे.