Bihar Grampanchayat Election 2021: बिहारमध्ये ग्राम पंचायतीच्या माजी प्रमुखाची केली हत्या, मुस्रीघरारी परिसरात अज्ञातांनी झाडली गोळी
Gun | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

बिहारमधील (Bihar) पंचायत निवडणुकांच्या (Grampanchayat Election) शुक्रवारी एका माजी सरदाराला काही लोकांनी लक्ष्य केले आहे. शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी समस्तीपूरच्या (Samastipur) मुस्रीघरारी (Musrigharari) पोलीस स्टेशन (Police Station) परिसरात बखरी बुजारग पंचायतीचे (Bakhari Bujarag Panchayat) माजी प्रमुख शशीनाथ झा (Shashinath Zha) यांची गोळ्या झाडून हत्या केली. हत्या (Murder) केल्यावर ते पळून गेले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की झा शुक्रवारी सकाळी साव टोला येथील एका पंचायतीमध्ये गेले होते. त्या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या गुन्हेगारांनी त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या घटनेत झा यांचा जागीच मृत्यू झाला. बिहारमध्ये राजदच्या (RJD) माजी आमदाराच्या मुलाला गुन्हेगारांनी गोळ्या घातल्या होत्या.

इघर मुस्रीघरी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय सिंह म्हणाले की घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी सांगितले की गुन्हेगार मोटारसायकलवर आले होते. ते म्हणाले की हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. येथे या घटनेची माहिती मिळताच लोक संतापले आणि गुन्हेगारांच्या अटकेची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त लोक रास्ता रोको करून निषेध करत आहेत. संतापलेल्या लोकांना समजावण्यात पोलीस अधिकारी व्यस्त आहेत. या घटनेनंतर गावात तणाव आहे.

बिहारमध्ये काही दिवसांनी पंचायत निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे सांगितले जात आहे की मृत व्यक्तीने या निवडणुकीत नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. बिहारमध्ये पंचायत निवडणुकीच्या आवाहना दरम्यान माजी प्रमुखांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

बिहार राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशा प्रकारे खुन करण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. त्यातून अनेक जणांना नाहक जीव गमवावे लागले आहेत. राजकीय मंडळींवर हल्ला करण्याची ही पहिली घटना नाही आहे. याआधी अशा बऱ्याच घटना समोर आल्या आहेत. यात काही गुन्ह्यांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. तर काही गुन्हेगार अद्याप फरार आहेत.