झोपमोड झाली म्हणून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण; पोलिसात तक्रार दाखल
प्रतिकात्मक प्रतिमा (File Image)

झोपमोड केल्याप्रकरणी पत्नीला बेदम मारहाण करणाऱ्या पतीच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना गुजरातमधील (Gujrat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे हा धक्कादायक प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपूर्वी फिर्यादी माहेरी गेली होती. त्यानंतर संबंधित महिला रविवारी रात्री उशीरा पतीच्या घरी परतली होती. त्यानंतर फिर्यादीने दरवाजा ठोठोवून पतीची झोपमोड केली. यामुळे संतापलेल्या पतीने फिर्यादीला मारहाण करायला सुरुवात केली, असे वृत्त सामना ऑनलाईन यांनी दिले आहे.

भावना असे फिर्यादी महिलेचे नाव असून घनश्याम चौहान हा मारहाण करणारा आरोपी आहे. दोघेही पती-पत्नी आहेत. भावना हिने आपल्या पती विरोधात वस्त्रपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भावना ही गेल्या एक आठवड्यापूर्वी आपल्या माहेरी गेली होती. रविवारी भावना माहेरुन नवराच्या घरी परतली त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. यानंतर त्यांनी दरवाजा ठोठावला सुरुवात केली. भावना यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावल्यामुळे घनश्याम याची झोपमोड झाली. यामुळे धनश्याम संतापला आणि दरवाजा उघडल्यानंतर भावना हिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर भावना यांनी स्थानिक पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली. हे देखील वाचा-मुंबई: व्हॉट्सऍप ग्रुपवर शालेय मुलींसोबत अश्लील चर्चा; 8 विद्यार्थी निलंबित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना ही गेल्या आठवड्यात तिच्या माहेरी गेली होती. भावना ही एक आठवडा माहेरी राहिल्यानंतर रविवारी नवराच्या घरी परतली. मात्र, केवळ दरवाजा उघडावा लागल्यामुळे भावनाच्या पतीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आणि तुला काय करायचे आहे ते कर, अशी धमकीही दिली. त्यानंतर भावनाने स्थानिक पोलिसांत धाव घतेली.