WhatsApp Representation Image (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सऍपवरील (WhatsApps) ग्रुपमधील संभाषणात आपल्या वर्गमैत्रीणीसोबत बलात्कार आणि अश्लील भाषा केल्यामुळे 8 विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आहे. ही घटना मुंबईतील (Mumbai) आंतरराष्ट्रीय बॅचलरियेट शाळेत (International Baccalaureate School) घडली आहे. धक्कादायक म्हणजे, निलंबित झालेल्या विद्यार्थ्यांचे वय केवळ 13- 14 वर्ष असून वर्गातील 2 मुलींच्या पालकांनी व्हॉट्सएपवरील संभाषण बघितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी याची माहिती शाळेत कळवली. मुलांच्या अशा वागणुकीमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुंबई मीरॉरने दिलेल्या वृत्तानुसार, 8 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबर दरम्यान आयबी शाळेतील मुलांनी आपल्या वर्गमैत्रीणीशी केलेल्या अश्लील संभाषणाने सर्व पालकवर्गाला विचार करायला भाग पाडले आहे. या संभाषणात एका मुलाने संबंधित मुलीला एक रात्र सोबत घालवण्याचा मॅसेज केला आहे. एवढेच नव्हेतर, निलंबित मुलांनी अश्लील शब्दांचाही वापर केला आहे. यात बलात्कार या शब्दांचा अधिकवेळा वापर केला आहे. तसेच लेस्बियन आणि गे असण्याबदल काही जणांची थट्टा केली गेली आहे. हे देखील वाचा- WhatsApp मध्ये पुन्हा मिळाला घातक बग; ग्रुप चॅट करताना पोहोचवायचा हानी

शाळेत तक्रार दाखल केलेल्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही या संदर्भात शाळेतील मुख्यांशी चर्चा केली आहे. शाळेकडून याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल, असा विश्वास पालकांनी व्यक्त केला आहे. माहितीनुसार, मुलांच्य अशा वागणुकीच्या भितीने काही मुलीं शाळेत जाण्यात घाबरत आहे.