Mohan Singh Bisht, Vijendra Gupta (फोटो सौजन्य - संपादित प्रतिमा )

Speaker And Deputy Speaker of Delhi Assembly: दिल्लीत भाजपच्या नवीन सरकारचा शपथविधी पार पडला. रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 6 मंत्र्यांनीही शपथ घेतली. दरम्यान, दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष (Speaker of Delhi Assembly) आणि उपाध्यक्षांची (Deputy Speaker of Delhi Assembly) नावेही जाहीर करण्यात आली आहेत. विजेंदर गुप्ता (Vijendra Gupta) हे दिल्ली विधानसभेचे नवे अध्यक्ष असतील तर मोहनसिंग बिष्ट (Mohan Singh Bisht) हे उपाध्यक्ष असणार आहेत.

विधानसभेत पक्षाने त्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिल्याची पुष्टी करताना विजेंदर गुप्ता यांनी सांगितले की, सर्वप्रथम, मी कॅगचे अहवाल सभागृहात सादर करणार आहे, जे मागील आप सरकारने प्रलंबित ठेवले होते. नव्याने स्थापन झालेल्या आठव्या दिल्ली विधानसभेत भाजपचे 48 आमदार आहेत, तर विरोधी पक्ष 'आप'चे 22 आमदार आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांची निवड सभागृहातील सदस्यांकडून केली जाते. (हेही वाचा - Rekha Gupta Delhi CM Oath: रेखा गुप्ता बनल्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री; रामलीला मैदानावर पार पडला शपथविधी सोहळा, 6 मंत्र्यांनीही घेतली शपथ)

दिल्लीच्या नवीन सरकारमध्ये प्रवीण वर्मा यांच्यासह सहा कॅबिनेट मंत्री असतील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी मुख्यमंत्री-नियोजित रेखा गुप्ता यांच्या सल्ल्यानुसार, भाजप आमदार परवेश साहिब सिंग वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार सिंग यांना दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून नियुक्त केले आहे. (हेही वाचा: Delhi New CM Rekha Gupta: जाणून घ्या कोण आहेत दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता; उद्या रामलीला मैदानावर पार पडणार शपथविधी समारंभ)

दरम्यान, आज रामलीला मैदानावर एका भव्य समारंभात नवीन नवनिर्वाचित मुख्यमंत्री गुप्ता यांच्यासोबत इतर मंत्र्यांनी शपथ घेतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.