Ultra Violet Sanitizing Machine (PC - Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने (Western Railway) एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. साबरमतीमधील (Sabarmati) 'एकीकृत कोचिंग डेपो'ने 'अल्ट्रा वॉइलेट सॅनिटाइजिंग मशीन'ची (Ultra Violet Sanitizing Machine) निर्मिती केली आहे. या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचे कागदपत्र तसेच फाईल्स सॅनिटाईज करता येतात. त्यामुळे या मशीच्या माध्यामातून कागदपत्रांमार्फत पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणं शक्य होणार आहे.

पश्चिम रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून या सॅनिटाईजर मशीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सरकारी तसेच खासगी कार्यालयामधील कागदपत्रांच्या माध्यामातून कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण टाळण्यासाठी हे मशीन अत्यंत उपयुक्त आहे. (हेही वाचा - Coronavirus Update in India: भारतात 14,821 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 4,25,282 वर)

यापूर्वी नाशिकच्या सटाणा येथील राजेंद्र जाधव यांनी ट्रॅक्टरच्या मदतीने सॅनिटायझेशन मशीनची निर्मिती केली होती. आपल्या गावाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चातून सॅनिटायझेशन मशीन तयार होतं. याबाबत, नरेंद्र मोदी यांनी राजेंद्र जाधव यांचे 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे कौतुक केलं होतं.

गेल्या तीन महिन्यांपासून भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. देशातील 4 लाखांहून अधिक जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी देशात 14,821 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. याशिवाय 445 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 13,699 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून 2,37,196 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.