
दिल्ली (Delhi) येथील करिअप्पा परेड ग्राऊंडवर देशाभरातून आलेल्या नॅशनल कॅडेट कोरच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) पाकिस्तानावर हल्ला चढवला आहे. भारताने आता पर्यंत तीन युद्धात पाकिस्तानच्या सैन्याची दाणादाण उडवली आहे. तसेच पाकिस्तानाला धुळ चारण्यासाठी भारतीय सैन्याला 10 दिवसही लागणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, ऐतिहासिक चुकीला सुधारण्यासाठी पाकिस्तानातील अल्पसंख्यांना दिलेल्या जुन्या आश्वासनांना पूर्ण करण्यासाठी नागरिकत्व दुरूस्ती कायदा आमलात आणण्यात आला आहे, असेही मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर सरकारची भुमिका स्पष्ट केली आहे. त्यावेळी मोदी म्हणाले आहे की, सरकारच्या निर्णयामुळे जगभरात मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, स्वताच्या प्रतिष्ठेसाठी मोदींचा जन्म झाला नाही. देशाची प्रतिष्ठाच मोदींसाठी आहे असे ते म्हणाले आहेत. तसेचकाश्मीर मध्ये काही लोक राजकारण करत राहिले. तिरंग्याचा अपमान होत असताना ते वोट बॅंकेकडे पाहत होते. एवढेच नव्हे तर तब्बल 70 वर्षानंतर काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आले आहे. भारताविरूद्ध पाकिस्ताना एकदाही जिंकू शकला नाही. त्यामुळे ते बॉम्ब स्फोट आणि आतंकवादीच्या माध्यमातून भ्याड हल्ला करत आला. आता भारतीय लष्कर अधिक बळकट झाले आहे. जर भारतीय सैनिकांनी ठरवले तर पाकिस्तानाला पराभवाची धूळ चारण्यासाठी 10 दिवसही लागणार नाहीत, असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. हे देखील वाचा- JNU चा माजी विद्यार्थी शरजील इमामला बिहारच्या जहानाबाद येथून अटक; काही दिवसांपासून होता फरार, 4 राज्यांत देशद्रोहाचा गुन्हा दाखल
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आपले शक्तिप्रदर्शन करत असल्याचे दिसत आहेत. भाजप 10 मोठ्या मुद्द्यांवर दिल्ली विधानसभा निवडणूक लढवत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या बैठकीत 10 मुद्द्यांवर प्रामुखपणे जोर दिला जात आहे. यात सर्जिकल स्ट्राईक, अनुच्छेद 370, नागरिकत्व दुरूस्ती कायदा यांसारख्या अनेक मुंद्यांचा समावेश आहे.