प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Delhi Lockdown Extended: दिल्लीतील कोरोना संसर्ग कमी होत असताना दिल्ली सरकारने लॉकडाऊनचा काळावधी एका आठवड्यासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता दिल्लीत 24 मे पर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. यावेळीही दिल्लीत मेट्रो चालणार नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दिल्लीतील लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढविण्यात येत असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे. पुढील सोमवारी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात येत आहे.

केजरीवाल म्हणाले की, गेल्या 24 तासात कोरोनाची जवळपास 6,500 प्रकरणे नोंदली गेली. सकारात्मकतेचा दर 1 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे आणि 10 टक्क्यांच्या जवळ आला आहे. दिल्लीतील 17 मे रोजी पहाटे पाच वाजता लॉकडाउन बंदी संपुष्टात येत होती. यापूर्वी रविवारी केजरीवाल यांनी लॉकडाऊन एका आठवड्यासाठी वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. (वाचा - भारतात कोविड-19 च्या तिसरी लाटेचे स्वरुप कसे असेल? संसर्ग कमी करण्यासाठी काय आहेत उपाय? जाणून घ्या तज्ञांचे मत)

केजरीवाल यांनी सांगितलं, लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिल्लीत दिसून येत आहे. 26 एप्रिलपासून नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गेल्या तीन दिवसांत संसर्गाचे प्रमाणही कमी झाले आहे. या लॉकडाउनचा उपयोग आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि संसाधनांना बळकट करण्यासाठी केला गेला आहे. पुढील आठवड्यात आणखी सुधारणा होणं अपेक्षा आहे. दिल्लीत लॉकडाऊन निर्बंध समान राहतील.

दिल्लीत यावेळी सार्वजनिक ठिकाणी विवाहसोहळे होणार नाहीत. घरात फक्त वीस लोकांसह विवाहसोहळा होईल. दरम्यान जीवनावश्यक वस्तूंसह जोडलेल्या लोकांना घराबाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल.