Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने देशाला हादरुन सोडले आहे. या लाटेचा उद्रेक होत असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर असेल असेल असा अंदाज तज्ञांकडून वर्तवण्यात आल्यामुळे नागरिकांच्या मनांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोविड-19 (Covid-19) ची तिसरी लाट नेमकी कधी येईल, हे सांगता येणार नाही, असे माजी स्वास्थ्य सचिव सुजाता राव यांनी  आहे. त्याचबरोबर त्यांनी 5 महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यामुळे नागरिकांच्या मनातील अनेक शंकांचे, प्रश्नांचे समाधान होणार आहे.

प्रश्न: कोरोना व्हायरसची तिसरी लाट येणार आणि याचा प्रभाव लहान मुलांवर सर्वाधिक पडणार?

उत्तर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं प्रभावित होतील असा कोणताही वैद्यकीय रिपोर्ट समोर आलेला नाही. परंतु, व्हायरसचे बी.1.617 स्वरूप अधिक संसर्गजन्य आहे. चाचणी, निगराणी, नियंत्रण आणि उपाय याचबरोबर कोरोनाच्या इतर नियमांचे पालन करुन कोरोनाचा प्रसार रोखता येईल. मात्र आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रश्न: कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचे स्वरुप कसे असेल? आणि ते कितपत भयंकर असू शकते?

उत्तर: कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची शक्यता असली तरी याचे स्वरुप नेमके कसे असेल, याबाबत निश्चितपणे सांगता येणार नाही. कोरोना नियमांचे पालन केल्यास आणि लसीकरण मोठ्या प्रमाणावर केल्यास तिसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू शकतो. त्यामुळे लसींचा पुरवठा सुनिश्चित करुन लसीकरण वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

प्रश्न: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटात लसीकरणाचे स्वरुप कसे असावे?

उत्तर: कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत असताना लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर आपल्या हातात अत्यंत कमी वेळ उरेल आणि या वेळेत 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी विकेंद्रीकरण हा महत्त्वपूर्ण सत्र आहे. जिल्हास्तरावर योजना आखून नागरिका, समाज, ग्राम पंचायत यांना यात सहभागी करायला हवे. शिक्षक, ड्राव्हर, घरी सामान पोहचवणाऱ्या व्यक्ती, औद्योगिक कर्मचारी यांच्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींना लस देणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या लाटेचा सामना करणे शक्य होईल.

प्रश्न: कोरोना व्हायरसमध्ये होत असलेला बदल किती हानिकारक असेल? सामान्य नागरिकांना यात कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे?

उत्तर: व्हायरस आपले स्वरुप बदल असून त्यास म्युटेशन असे म्हटले जाते. एका व्हायरसमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतात. त्यामुळे मोठ्या संख्येत लसीकरण करणे किंवा ते न झाल्यास कठोर कोविड नियमांचे पालन करणे हा उपाय असू शकतो.

प्रश्न: कोरोना व्हायरसच्या बदलत्या स्वरुपाशी सामना करण्याचा मार्ग कोणता?

उत्तर: येत्या काळात कोरना व्हायरसचे कोणतेही स्वरुप समोर आले तरी त्यावर मात करण्याचे दोनच मार्ग आहेत- एक म्हणजे लसीकरण आणि दुसरे म्हणजे मास्क घालणे, सोशल डिस्टसिंगचे पालन करणे. त्याचबरोबर भारत सरकारने लसींचे उत्पादन वाढवणे देखील गरजेचे आहे. अधिकाधिक कंपन्यांना लस उत्पादनात सहभागी करणे आवश्यक आहे.

दरम्यान, आज देशात  3,11,170 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 4,077 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 36,18,458  सक्रीय रुग्ण असून 18,22,20,164 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.