Hoil in delhi PC TWITTER

Viral Video: देशात ठिकठिकाणी होळी (Holi) हा सण महिन्याअगोदरच खेळायला सुरु केला जातो. लहान असो किंवा मोठे होळी हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे. काही ठिकाणी होळी खेळण्यास देखील सुरुवात झाली असावी. दरम्यान सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरुण भरधाव कारमधून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर पाण्याचे फुगे फेकताना दिसत आहेत. या धक्कादायक घटनेला नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ हा नवी दिल्लीतील असल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, नवी दिल्लीतील रस्त्यावरून एका कारमधून दोन तरुण सनरुफमध्ये बाहेर उभे आहेत.त्यानंतर दोघे तरुण रस्त्यावरून  येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाण्याने भरलेले फुगे फेकत आहेत.हा विचित्र प्रकार एकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे. शेवटी तरुणांनी व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीवरही फुगे फेकले आहेत. हेही वाचा- प्री-वेडिंग फोटोशूट पडलं महागात! ऋषिकेशमध्ये गंगा नदीत अडकले जोडपे

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सोशल मीडियावर एक्सवरील @sneha singh या अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ खाली तीने या संदर्भात माहिती देखील दिली आहे. ''16 मार्च दुपारी नवी दिल्लीतील वसंत कुंज येथे दोन तरुण रस्त्यावरील व्यक्तींना पाण्याचे फुगे मारून फेकताना दिसले. हे खरंच खूप धोकादायक आहे आणि यामुळे कोणीही जखमी होऊ शकतो. या पोस्ट खाली तीने दिल्ली पोलिस आणि टॅफिक पोलिसांना टॅग केले आहे.