Viral Video: प्री-वेडिंग फोटोशूट पडलं महागात! ऋषिकेशमध्ये गंगा नदीत अडकले जोडपे

ऋषिकेशमध्ये एका जोडप्यला प्री-वेडिंग फोटोशूट करण चांगलचं महागात पडलं आहे. फोटोशूटसाठी गंगा नदीत गेलेले जोडपे नदीच्या मधोमध अडकले. त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले.

Viral Video: प्री-वेडिंग फोटोशूट पडलं महागात! ऋषिकेशमध्ये गंगा नदीत अडकले जोडपे
Photo Credit - Twitter

Viral Video: सध्या लग्नसराई सुरू आहे. भारतीय लग्नांमध्ये ( Wedding Season) विविध परंपरा असतात. त्यातच आता नवीन जोडप्यांमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Photoshoot ) करण्याची वेगळीच क्रेझ आहे. त्यासाठी काही जण राजस्थानमधील वाळवंटात जातात, काही जम्मू-काश्मिरमधील बर्फाळ डोंगरात जातात. पण तिथेही त्यांना चांगले फोटो काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोर जाव लागतं. अशीच एक घटना ऋषिकेशमधून (Rishikesh) समोर आली आहे. ज्यात ऋषिकेशमध्ये फोटोशूट करत असताना हे जोडपे (Couple Photoshoot ) गंगा नदीच्या मधोमध अडकले, त्यानंतर एसडीआरएफच्या टीमला त्यांची सुटका करावी लागली. कृष्णदेव यादव नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. नवीन जोडप्याने सावध राहावे असे, व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे.(हेही वाचा :Viral Video: तरुणीचा भरधाव कारसोबत जीवघेणा स्टंड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 21, 2024 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).