Viral Video: नोएडा पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी काका आणि पुतण्याला अटक केली आहे. पतीने पुतण्यासोबत मिळून पत्नीचा खून केला होता. खोलीत पडलेल्या मृतदेहाचा वास आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. हे प्रकरण नोएडातील फेज 3 पोलीस स्टेशन परिसरातील गढी चौखंडी गावाशी संबंधित आहे. पोलीस स्टेशन फेज 3 ने आरोपी सर्वेश गुप्ता आणि त्याचा पुतण्या पवन गुप्ता यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते, जिथे त्यांनी हत्येची कबुली दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या चौकशीत सर्वेश गुप्ताने सांगितले की, त्याचे २०११ मध्ये लग्न झाले होते. हे देखील वाचा: Niti Aayog Meeting: पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाच्या बैठकीत माईक बंद केल्याचा ममता बॅनर्जींचा दावा; निर्मला सीतारामन यांनी सांगितले खरे कारण
गेल्या एक वर्षापासून दोघेही गढी चौखंडी गावात भाड्याने राहत होते. पती सर्वेश सेक्टर-६७ मधील एका कंपनीत शिंपी म्हणून कामाला होता, पत्नीही दुसऱ्या कंपनीत धागा कापण्याचे काम करते. सर्वेशला त्याच्या पत्नीवर संशय होता कारण ती बाहेर काम करत होती आणि बहुतेक वेळा मोबाईल फोन वापरत होती. या संशयावरून तो तिला मारहाण करून जीवे मारण्याची भाषा करत असे.
पत्नीचा राग आल्याने सर्वेशने तिचा खून करण्यासाठी चुलत भाऊ पवन गुप्ता याला गावातून बोलावून घेतले होते. पोलिसांनी सांगितले की, 23 जुलै रोजी रात्री सर्वेशची पत्नी मोबाईल वापरत असताना आरोपीने पत्नीकडे मोबाईल मागितला, यावरून दोघांमध्ये भांडण झाले. भांडणानंतर सर्वेशने आपल्या पुतण्यासोबत पत्नीचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह कपड्यात गुंडाळून खोलीत लपवून ठेवला आणि कुलूप लावले.