Congress Worker Shot Dead: पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीसाठी (Bengal Panchayat Election 2023) उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी मुर्शिदाबादच्या खारग्राममध्ये काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. फुलचंद शेख असे मृताचे नाव आहे. या घटनेत एका महिलेसह काँग्रेसचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
काँग्रेसने या हल्ल्याचा ठपका तृणमूलवर ठेवला आहे, तर सत्ताधारी पक्षाने या घटनेत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी फुलचंद शेख हे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांसह घरासमोर बसले असताना त्यांच्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला. आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. शेख यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा -Uttar Pradesh: आग्रा येथे पतीने पत्नीचे लावले अश्लील पोस्टर, कारवाई न झाल्यास महिलेने दिला आत्महत्येचा इशारा (Watch Video))
या घटनेत एका महिलेसह काँग्रेसचे चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेस समर्थित बदमाशांवर हत्येचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, बंगालमध्ये जंगलराज सुरू आहे. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. या घटनेबाबत त्यांनी राजपाल यांच्याकडे तक्रारही केली आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयुक्तांनी या घटनेबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे.
टीएमसीने फेटाळले आरोप -
दुसरीकडे तृणमूलचे नेते जयप्रकाश मजुमदार यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत तृणमूल काँग्रेसचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. वैयक्तिक वैमनस्य किंवा अन्य कारणातून ही हत्या करण्यात आली आहे. मुर्शिदाबादच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.