Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चढताना घडला थरारक, हवालदाराने वाचवले महिलेचे प्राण (Watch Video)
Viral video Bihar PC TWITTER

Viral Video: बिहार येथील पाटलीपुत्र येथील रेल्वे स्थानकावर थरारक घटना घडली आहे. आपल्या मुलासह धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना महिलेचा तोल गेला. वेळीच रेल्वे हवालदारानी महिलेला वाचवला आहे. थोडक्यात महिला एका मोठ्या अपघातातून बचावली आहे. ही घटना संपुर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आरपीएफ इंडियाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, महिला तिच्या मुलाला भरधाव ट्रेनमध्ये चढत असते. परंतु महिलेचा तोल जातो तेवढ्यात ड्युटीवर तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल यांनी महिलेला वाचवले. जमील अख्तर आणि सौरभ कुमार या दोन कॉन्स्टेबलनी महिलेचा जीव वाचवला आहे. (हेही वाचा- लोकल ट्रेनला लटकून तरुणाचा खतरनाक स्टंट,धक्कादायक Video व्हायरल