Vedanta Limited: कस्टम प्राधिकरणाने वेदांतला 92.04 कोटी रुपयांचा दंड आणि 10 कोटी रुपयांची भरपाई ठोठावली आहे. मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी हा आदेश मिळाल्याची माहिती वेदांत लिमिटेडने शेअर बाजाराला दिली. कंपनीने सांगितले की, कंपनीला सीमा शुल्क आयुक्त, तुतिकोरिन यांच्या कार्यालयाकडून एक नोटीस प्राप्त झाली, ज्यामध्ये 92,03,85,745 रुपये दंड आणि सीमा शुल्क आणि लागू व्याजासह 10,00,00,000 रुपये भरपाईची मागणी करण्यात आली. यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे वेदांत लिमिटेडने म्हटले आहे. पुढील कार्यवाहीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. वेदांत लिमिटेड ही वेदांत रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी आहे. हे देखील वाचा: Ratan Tata Dies: टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचे अंत्यसंस्कार संपूर्ण शासकीय इतमामात होणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कंपनीने सांगितले की, 'कंपनीला विश्वास आहे की, तिच्याकडे मजबूत कायदेशीर आधार आहे, विशेषत: अलीकडील न्यायालयीन निर्णय लक्षात घेता, योग्य वेळी पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. या ऑर्डरचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर, ऑपरेशन्सवर किंवा इतर क्रियाकलापांवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होईल यावर कंपनीचा विश्वास नाही.