Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद येथील शाळेच्या आवारात खेळत असताना अचानक एक मुलगा जमिनीवर कोसळला आणि दरम्यान त्याच्या मृत्यू झाला. या धक्कदायक घटनेमुळे शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 9 मार्चला घडली आहे. चंद्रकांत असं मृत मुलाचे नाव आहे. ती हिमायूनपूर येथिल रहिवासी होता. चंद्रकांत हंस वाहिनी शाळेत शिकत होता. (हेही वाचा- अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री सोफिया लिओन हीचं निधन
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले शाळेच्या आवारात खेळत होती. अचानक पळत असताना चंद्रकांत जमिनीवर कोसळला. पटकन एका मुलाने त्याच्या जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानतंर ही घटना वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सांगण्यात आली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
8 साल का चंद्रकांत स्कूल इंटरवल में खेलने निकला। अचानक जमीन पर गिरा और मौत हो गई।
📍फिरोजाबाद, उत्तर प्रदेश pic.twitter.com/PkDz1sCw9h
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) March 9, 2024
शिक्षकांनी ही घटना चंद्रकांत यांच्या पालकांना दिली. चंद्रकांत याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, त्याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. चंद्रकात याच्या अकाली निधनामुळे कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.