
Uttar Pradesh Double Murder: उत्तर प्रदेशात ललितपूर मध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि निष्पाप चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. पतीला पत्नीला सोडून आपल्या मेहणीशी लग्न करायचे असल्याने आरोपी पतीने मुली आणि पत्नीची हत्या केली. पतीने क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत दोघांनाही संपवले आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नी (22) आणि मुलगी (1) वर्षाची होती. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- चार वर्षाच्या मुलाच्या हत्ये प्रकरणी सीईओ सुचना सेठ यांना अटक, मृतदेह बॅगेत ठेवून केला गोव्याहून प्रवास;)
मिळालेल्या माहितीनुसार, ललितपूर येथील सदर कोतवाली परिसरातील चांदमारी गावात ही घटना घडली. नीरज कुशवाह असं या आरोपी व्यक्तीने नाव आहे. पतीने पोलिसांना बनावट कहाणी सांगितली ज्यामुळे पोलिसांना तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. सांगितल्या प्रमाणे, घरात तोंड बांधून अज्ञात लोक घुसले आणि त्यांनी पत्नी आणि मुलीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. रात्री १.३०च्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून 6 लोक घरात शिरले, त्यानंतर दोघांना ही मारहाण केली आणि मला बांधून ठेवले. या जब्बर मारहाणीत जखमी अवस्थेत त्यांनी प्राण गमावला. घरातील रोख रक्कम घेऊन गेले आणि दागिने पळवले. जखमी अवस्थेत रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले.
पोलिसांना या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता, त्यांनी नीरजची कसुन चौकशी केली. त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांचा संशय ठाम झाला. आरोपीने चौकशीत गुन्हा कबुल केला आणि सर्व हकिकत सांगितली. चौकशीत सांगितल्या प्रमाणे नीरजा आपल्या मेहूणीसोबत लग्न करायचे होते, पत्नी दिवसभर रिल्स बनवायची सोशल मीडियावर चॅट करायची, या सर्वांना विरोध असताना तीनं केल. मेहुणीच्या लग्नासाठी विचारल्यानंतर तीन नकार दिला. या गोष्टीचा राग अनावर झाला आणि बॅटने मारहाण करून दोघांनाही संपवले. या प्रकरणी नीरज वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.