उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी शनिवारी एक 112 या नंबरची नवीन आपत्कालीन सेवा सुरु केली आहे. ही सेवा सर्वसमावेशक असून पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अन्य सेवा या 'आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली' अंतर्गत सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 'सवेरा' नावाचा उपक्रम सुरु करण्याचीही घोषणा केली आहे.
यावेळी अदित्यनाथ म्हणाले,''ह्या एकल सेवा क्रमांकामुळे प्रतिसादाला लागणार अतिरिक्त वेळ कमी होईल. 112 या सेवेचा 'रूट चार्ट' तयार करून तो जिल्हा, स्थानिक स्तरावर स्थापित केला जाईल. जनसामान्यांना आता प्रत्येक वेळी गरज लागल्यानंतर वेगवेगळे नंबर लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. सर्व आपत्कालीन सेवांचं एकत्रीकरण या नंबरच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. याआधीही बऱ्याच राज्यातून ही प्रणाली सुरू केली गेली आहे आणि हा नंबरबद्दलची जागरूकता आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवली पाहिजे.''हेही वाचा. 7 th Pay Commission अंतर्गत विविध पदांसाठी IIT Tirupati ची नोकरभरती; अर्ज भरण्याची वेळ मर्यादा 30 ऑक्टोबर पर्यंत)
तसेच सवेरा उपक्रमाबद्दल बोलताना अदित्यनाथ यांनी सांगितले,''बऱ्याच ठिकाणी, खासकरून शहरी भागात वयोवृद्ध जोडपी एकटीच राहतात आणि त्यांना कुणाचा सहारा नसतो. या उपक्रमामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल त्यांच्यामध्ये एक प्रकारचा विश्वास दृढ होईल. स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत सुद्धा असाच काहीसा उपक्रम हाती घ्यायचा आमचा विचार सुरु आहे.
108, 102 च्या वैद्यकीय सुविधा, 1090 आणि 181 च्या महिला हेल्पलाईन सेवा, मुख्ज्यमंत्री हेल्पलाईन क्रमांक, रुग्णवाहिका आणि अन्य सेवांचं एकत्रीकरण केली गेलेली ही सुविधा एक चांगला आदर्श ठरू शकते.