7 th Pay Commission अंतर्गत विविध पदांसाठी IIT Tirupati ची नोकरभरती; अर्ज भरण्याची वेळ मर्यादा 30 ऑक्टोबर पर्यंत
7 th Pay Commission Job Recruitment (Pixabay)

तिरुपतीच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि (Indian Institute Of Technology, Tirupati) ने विविध पदांसाठी सुरु केलेल्या नोकरभरतीच्या प्रक्रियेबाबत एक पत्रक जारी केले आहे. या सर्व पदांचा कार्यभार स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगा (7 th Pay Commission) अंतर्गत वेतन मिळणार आहे. प्राध्यापक (Professor),  सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) आणि सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठी ही भरती असणार आहे. परंतु यासाठी इच्छुक अर्जदारांनी 30 ऑक्टोबर पर्यन्त अर्ज भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सर्व अर्जदारांनी अर्ज करण्या अगोदर एकदा अधिकृत सुचनेंकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या दोन्ही गोष्टी पडताळून पाहाव्यात.

भरतीसाठीची पदं:

प्राध्यापक

सहयोगी प्राध्यापक

सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:

मूलभूत शैक्षणिक पात्रता, सर्व इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदव्यूत्तर शिक्षण, PhD पदवी तसेच चांगली शैक्षणिक पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे.

अनुभव:

प्राध्यापक- उद्योग, शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 10 वर्षांचा अनुभव आवश्यक, पैकी 6 वर्ष एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत सहयोगी अध्यापकाचा अनुभव.

सहयोगी प्राध्यापक- उद्योग, शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रामध्ये सहा वर्ष अध्यापनाचा अनुभव.

सहाय्यक प्राध्यापक- उद्योग, शिक्षण किंवा संशोधन क्षेत्रामध्ये तीन वर्ष अध्यापनाचा अनुभव. (हेही वाचा. Maharashtra HSC Board 2020 Exam: 12 वीच्या विद्यार्थ्यांना mahahsscboard.in वर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ)

वेतन:

प्राध्यापक- मूलभूत वेतन: 1,59,100 (शैक्षणिक वेतन पातळी 14 अ आणि 7 व वेतन आयोग सेल 1)

सहयोगी प्राध्यापक- मूलभूत वेतन: 1,39,600 (शैक्षणिक वेतन पातळी 13 अ 2 आणि 7 व वेतन आयोग सेल 1)

सहाय्यक प्राध्यापक- मूलभूत वेतन: 1,01,500 (शैक्षणिक वेतन पातळी 12 आणि 7 व वेतन आयोग सेल 1)

वयोमर्यादा:

सहाय्यक प्राध्यापकासाठी वयोमर्यादा 38 वर्षे आहे. तर सहयोगी प्राध्यापकासाठी 45 वर्षे आहे.

अर्ज कुठे कराल?

या पदांच्या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्ही अधिकृत वेबसाईट -/facapp,iittp.ac.in- इथे पूर्ण करू शकता.