उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) यमुना एक्स्प्रेसवर (Yamuna Expressway) अपघाताचे (Accident) सत्र सुरुच आहेत. यातच मंगळवारी रात्री उशीरा डिझेल टॅंकर आणि इनोव्हा कारमध्ये जोरदार धडक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. भरधाव वेगात असलेले डिझेल टँकर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या इनोव्हा गाडीवर उलटल्याने हा अपघात घडला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, याच इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल टॅंकर हा आग्र्याहून नोयडाकडे जात होता. मात्र, यमुना एक्स्प्रेस वेवर टॅंकर चालकाचे नियंत्रण सुटले. ज्यामुळे भरधाव वेगात असलेले डिझेल टँकर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या इनोव्हा गाडीवर उलटले. महत्वाचे म्हणजे, टँकर इनोव्हावर उलटल्यामुळे कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे National Cow Commission चा सल्ला- 'गायीच्या शेणापासून तयार होणारा CNG वापरा'
मनोज, बबिता, अभय, कोमल, कल्लू, हिमाद्री आणि ड्राइव्हर राकेश या अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचे नावे आहेत. हे सर्व जण सफीदों जींद येथील रहिवासी होते. या अपघातामुळे या सर्वांच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे.