Shripad Naik's Wife Dies: केंद्रीय मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघतात त्यांची पत्नी विजया नाईक (Vijaya Naik) यांच्यासह त्यांच्या पीएचाही मृत्यू झाला आहे.  उत्तरा कन्नडच्या (Uttara Kannada) अंकोला तालुक्यातील (Ankola Taluka) गावाजवळ त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे.  या अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले असून गोव्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी राजकीय नेत्यांसह संपूर्ण देश प्रार्थना करत आहेत.

श्रीपाद नाईक आपल्या पत्नीसह बाहेर जात असताना कर्नाटकमधील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील अकोला येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. श्रीपाद यांच्या वाहनामध्ये एकूण सहा जण होती. अपघातानंतर श्रीपाद नाईक यांची पत्नी बऱ्याच वेळ बेशुद्ध पडल्या होत्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयात पोहचल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तसेच अपघात गंभीर जखमी झालेले श्रीपाद यांना सुरुवातीला जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. हे देखील वाचा- Union Budget 2021: कोरोना विषाणूमुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच छापली जाणार नाहीत अर्थसंकल्पाची कागदपत्रे; अर्थमंत्री निर्मला सीतारमण सॉफ्ट कॉपीवरुन वाचतील भाषण

एएनआयचे ट्विट-

केंद्रात मंत्री असलेले 68 वर्षीय श्रीपाद नाईक हे उत्तर गोव्यातील भाजपचे खासदार आहेत. नाईक यांच्यावर केंद्रात आयुष मंत्रालयाची तसेच संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी आहे. मात्र, रस्ता अपघातात त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे.