केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Union Budget 2021) सादर केला असून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सध्या देशावर कोरोनाचे संकट वावरत असल्याने यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या अर्थसंकल्पात अनेक क्षेत्रावर भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात काय होणार स्वस्त आणि काय महाग होणार? हे पाहणे अधिक महत्वाचे ठरणार आहे.
लॉकडाऊनमुळे सोने-चांदीचे भाव गगणात भिडले आहेत. मात्र, कस्टम ड्युटी कमी होणार आहेत. ज्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय भारतीय बनावटीचे मोबाईल स्वस्त होणार आहेत. तर, परदेशी बनावटीचे मोबाईल, चार्जर महागणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार असल्याने वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- Union Budget 2021-22: केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक, नागपूर मेट्रोसाठी केलेल्या विशेष तरतूदीबाबत देवेंद्र फडणवीसांनी या जिल्ह्यांतील नागरिकांचे केले अभिनंदन
काय होणार स्वस्त?
सोने-चांदी, भारतीय बनावटीचे मोबाईल, चप्पल, नायलॉन (कस्टम ड्युटी कमी करून पाच टक्क्यांवर), टेक्सटाईल्स (कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार), केमिकल (कस्टम ड्युटी कमी करणार), स्टील (कस्टम ड्युटी कमी करून 7.5 टक्क्यांवर).
काय होणार महाग?
आपारंपारिक उर्जा- सोलार, पॅनल- इन्व्हर्टर (5 वरून 20 टक्क्यांवर), मोबाईल ऑटो पार्ट (काही गोष्टींवर कस्टम ड्युटी वाढवली), परदेशी मोबाईल चार्जर, तांब्याचे सामान, जम्स स्टोन (कस्टम ड्युटी वाढवली), इशाईळ अल्कोहोल.
निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात या बजेट संदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पामुळे आता महाराष्ट्रातही चांगलेच राजकारण तापले आहे. या अर्थसंकल्पानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहेत.