केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी (Pregnant Women) मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) अंतर्गत गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी 7 हजार 500 रुपये मिळणार आहेत. केंद्रीय कामगार मंत्रालयाने यासंदर्भात एक ड्राफ्ट तयार करून सूचना दिल्या आहेत. येत्या 30 दिवसांत लोकांकडून या ड्राफ्टवर हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.
या निर्णया अंतर्गत सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आरोग्य विमा योजनेंतर्गत प्रसुती खर्च 7 हजार 500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ही रक्कम 5 हजार रुपये आहे. यामध्ये 2 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा - National Education Policy 2020: नव्या शैक्षणिक धोरणासंबंधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल निशंक यांची पत्रकार परिषद व्हिडिओ इथे पाहा; 29 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
दरम्यान, महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्यांना केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा योजनेतंर्गत प्रसुती खर्च देण्यात येतो. हा प्रसुती खर्च ईएसआयसीच्या हॉस्पिटल किंवा औषध केंद्रापर्यंत पोहचू न शकलेल्या महिलांची इतर रुग्णालयात प्रसुती होते. त्यांना प्रसुती खर्च म्हणून याचा लाभ दिला जातो. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.