आसाममध्ये आज 1348 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ; 29 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Siddhi Shinde
|
Jul 29, 2020 11:37 PM IST
(Maharashtra SSC Results) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 10 वी चा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. कोरोना संकटामध्ये भूगोलाचा पेपर रद्द करून त्याचे सरासरी गुण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता पहायला मिळत आहे. आता येत्या काही तासांतच विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतिक्षा संपणार आहे.
(Monsoon Update) दुसरीकडे मान्सून अपडेट पाहायला गेल्यास, आज मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईतील बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो म्हणूनच मुंबईसाठी येल्लो अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा मध्ये देखील आज अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान, कोरोना व्हायरस अपडेट (Coronavirus Update) नुसार, महाराष्ट्रात काल, कोरोनाचे 7717 नवे रुग्ण आढळून आले. सध्या राज्यात 1 लाख 44 हजार 694 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात काल पहिल्यांदा 10 हजार 333 एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 32 हजार 277 झाली आहे. देशात सुद्धा कोरोना रिकव्हरी रेट उत्तम आहे. कोरोना सहित अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.